पुणे आणि मुंबई ही एकाच राज्यातील दोन महत्त्वाची शहरं. सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख तर आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख. या दोन्ही शहरातील नागरिकांना आपल्या शहराचा प्रचंड अभिमान आहे. शिक्षणासाठी अनेक मुंबईकर पुण्यात गेले आहेत तर नोकरीसाठी अनेक पुणेकर मुंबईत आले. त्यामुळे नक्की कोणतं शहर चांगलं याविषयी अनेकवेळा चर्चा रंगतात. यातून अनेकदा लाडिक वादही निर्माण होतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला दोन्ही शहरं का प्रसिद्ध आहेत आणि पुण्यालाच जास्त का महत्त्व दिलं जातं, याविषयी आज माहिती देणार आहोत.
थंड हवामान
मुंबईचं वातावरण दमट आहे. त्यामानाने पुणे हे शहर फार उष्ण वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे हवा-बदल करण्यासाठी अनेक मुंबईकर पुण्यात येत असतात.
पावलापावलावर रम्य स्थळे
पुण्यात अगदी तासाभरात आपण भरपूर निसर्गसौंदर्याचा आनंद घेऊ शकतो. पश्चिम घाटावर तर पर्यटकांची ये-जा सुरू असतेच. शिवाय येथे ट्रॅफिकचाही गोंगाट फार कमी असतो. त्यामुळे अगदी तासाभरात आपल्याला हवं असलेल्या ठिकाणी आपण सुरळीत पोहोचू शकतो.
खवय्यांचे माहेर
पुण्यातील खाद्यपदार्थांविषयी काही नवं सांगायलाच नको. केवळ तिथली चव चाखण्यासाठी विविध शहरातील लोक पुण्यात दाखल होत असतात. पुण्यातील अनेक हॉटेल्सही फार प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मुंबईतून काहीजण खास जेवणासाठीही पुण्यात येतात आणि जेवणाचा यथेच्छ आनंद घेतात.
थंडीचं उबदार वातावरण
पुण्यातील थंडी तुम्ही कधी अनुभवली आहे का? पुण्यात अनेक रम्य ठिकाणं आहेत, त्यामुळे हिवाळ्यात अनेक पर्यटक खास थंडी अनुभवण्यासाठी पुण्यात येत असतात.
दर्जेदार शैक्षणिक संस्था
पुण्याला शैक्षणिक राजधानीही म्हणतात. पुण्यातील बहुतेक सगळ्याच शैक्षणिक संस्था देशभरात फार प्रसिद्ध आहेत. त्यामुळे देशभरातील लोक येथे शिकायला येतच असतात. डि.वाय.पाटील, फर्ग्युसन कॉलेज, सिम्बॉसिस, भारतीय विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, एफटीआय अशा अनेक शैक्षणिक संस्था देशभरात नावाजलेल्या आहेत. पुण्याला पूर्व भारतातील ऑक्सफर्ड असंही म्हणतात.
निवृत्त नगरी
पुण्याला निवृत्त नगरी असंही म्हणतात. नोकरीतून निवृत्त झाल्यावर पुण्यात स्थायिक झालेले कित्येकजण आनंदाने आयुष्याची संध्याकाळ व्यतित करत आहेत. पण सध्या आयटी क्षेत्रात क्रांती झाल्याने पुण्यातही अनेक आयटी कंपन्या आल्या आहेत. मात्र त्यामुळे पुण्यातील शांतता अजिबात भंग झालेली नाही. पुण्यासारखं शांत आणि सुंदर शहर महाराष्ट्रात नाही असं कित्येकजण सांगतात.
सांस्कृतिक नगरी
पुण्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल कित्येकांना माहितच असेल. पुण्याला ज्याप्रमाणे इतिहास लाभला त्याचप्रमाणे पुण्याने परंपरेने चालत आलेला सांस्कृतिक वारसाही जपला आहे. गणेश चतुर्थी म्हणेज पुण्यातील शानच आहे.
आकर्षक घरे
कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण काहीजण असं म्हणतात की, पण पुण्यातील घरं मुंबईतील घरांपेक्षा फार चांगली आणि सुटसुटीत आहेत. पुण्यातील अनेक घरांसमोर मोठ-मोठी दालने, खिडक्या आणि बाल्कनी आहेत.