अनेक लोक सेव्हिंगला भविष्यातील कमाई मानतात. ज्यामुळे अनेक लोक बऱ्याच गोष्टींमध्ये कंजूषी करतात. अनेकदा लोकांची ही कंजूषी काही प्रमाणात चालून जाते. पण काही लोक कंजूषपणाची सीमा पार करतात. ज्यांना लोक महाकंजूष म्हणतात. आज आम्ही तुम्हाला जगातल्या सर्वात कंजूष महिलेचा किस्सा सांगणार आहोत. ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल.
आम्ही तुम्हाला सांगतोय ४१ वर्षीय बेकी गुइल्सबाबत. या महिलेचं मत आहे की, ती जगातली कोणतीही वस्तू फार कमी दरात किंवा पूर्णपणे फ्रीमध्ये घेऊ शकते. तिच्या डोक्यात सतत पैशे वाचवण्यासाठी काहीना काही आयडिया येत राहतात. कारण तिचं मत आहे की, पैसे वाचवण्याचा अर्थ हा पैसे कमवणे असाच होतो.
बेकी घरात सजावटीचं आणि प्रत्येक खराब झालेल्या वस्तूला ठीक करण्याचं काम स्वत: करते. सजावटही ती टाकाऊ वस्तूंपासून करते. तिच्या कंजूषीचा अंदाज तुम्ही यावरून घेऊ शकता की, तिने पैसे वाचवण्यासाठी घरातील पाण्याची सप्लायही बंद केलाय. पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी ती बाहेरचा बर्फ जमा करते आणि नंतर त्याचाच वापर करते.
तुम्हाला वाचून धक्का बसेल की, ही महिला वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासोबतच भांडीही धुते. जेणेकरून भांड्याच्या साबणाचे पैसे वाचतील. आणि बर्फाने दात ब्रश करते. इतकंच नाही तर घरातील सदस्यांनाही ती असंच करायला सांगते. याच बचतीतून तिने पहिल्या वर्षी इतके पैसे जमा केले होते की, तिचं इन्कम न झाल्याने जे नुकसान झालं, त्याची भरपाई झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, बेकीच्या परिवारात तिचा ३९ वर्षीय पती, ७ वर्षीय मुलगा जॉर्ज आणि ४ वर्षीय मुलगा कोल्डन राहतो. बेकीने तिची २५ हजार पाउंडची नोकरी सोडून एक हाउसवाइफ होण्याचा निर्णय घेतला होता. कारण तिला तिच्या पहिल्या बाळाच्या जन्मानंतर त्याच्यासोबत वेळ घालवायचा होता.