(Image credit- TOI)
आजही देशातील ग्रामीण भागात अशी काही ठिकाणं आहेत. जिथं शाळा, कॉलेजेसारख्या मूलभूत आणि आवश्यक सेवा पोहोचलेल्या नाहीत. महाराष्ट्राच्या अनेक खेड्या पाड्यामध्ये अशीच स्थिती आहे. मुलांच्या अभ्यासाचे हाल होऊ नयेत तसंच त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी बेंगलूरूमधील नागपूरचा रहिवासी असलेल्या हिमांशू मुनेश्वर देवर याने स्थानिक कामगाराच्या समस्या लक्षात घेता अशी बॅग तयार केली आहे. ज्याचा वापर करून दोन्ही गोष्टी केल्या जाऊ शकतात. शाळेच्या बॅगप्रमाणे तसंच वह्या, पुस्तक ठेवण्यासाठी एखाद्या टेबलप्रमाणे या बॅगचा वापर करता येऊ शकतो.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार हिमांशूने सांगितले की, ''मला त्या मुलांसाठी काहितरी करायचं होतं ज्यांना शाळेत डेस्क नसल्यामुळे पोस्चरच्या (मान, कंबर, पाठ) समस्येचा सामना करावा लागत होता. मी माझ्या गावी गेलो होतो तेव्हा दिसून आलं की, अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी तासनतास मान, पाठीला त्रास घेऊन बसत आहे. हे पाहिल्यानंतर खूप वाईट वाटायचे.' म्हणून हिमांशूने एक बॅग तयार केली. साधारणपणे ३ किलोपर्यंत वजन उचलण्याची क्षमता या बॅगेत आहे.
मुलांच्या पाठीचा आणि मानेचा विचार करून या बॅगचे डिजाईन करण्यात आले आहे. मुलं ही बॅग कुठेही सहज घेऊन जाऊ शकतात. या बॅगला दोन पट्ट्या लावल्या आहेत. याशिवाय दोन मेटल स्टॅडसुद्धा या बॅगला लावण्यात आले आहेत. या मेटल स्टॅडच्या साहाय्याने बॅगचा डेस्कप्रमाणे वापर केला जाऊ शकतो. याला म्हणतात मेहनत! सायकलस्वाराने शेअर केला पायांचा फोटो अन् नेटिझन्स म्हणाले....
या प्रकल्पासाठी नोकरीची संधी सोडली
हिमांशूसह एका एनजीओचे सहकारी मिळून अजून उत्तम बॅग डिजाईन करण्यासाठी काम करत आहेत. जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही बॅग पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी हिमांशूने कार्पोरेट कंपनीची नोकरी करण्याची संधीही नाकारली. असं हिमाशूंने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते. Video : डाव्या बाजूने ओव्हरटेक करायला गेला अन् उंटाने चांगलाच धडा शिकवला; पाहा व्हिडीओ