नवी दिल्ली । मागील दोन-तीन वर्षांपासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाचे जनजीवन विस्कळीत केले होते. त्यामुळे सगळे व्यवहार ठप्प झाले, काहींना आपली नोकरी गमावली लागली तर काही जण अद्याप नोकरीच्या शोधात आहेत. दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे, त्यामुळे तरूण वर्गामध्ये गोंधळाचे वातावरण आहे. दरम्यान नोकरी मिळवण्यासाठी एका तरूणाने अशी शक्कल लढवली आहे ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सोशल मीडियावर आता या घटनेची मोठी चर्चा रंगली आहे. कारण या तरूणाने कर्मचाऱ्यांना लक्ष वेधून घेण्यासाठी एक भन्नाट मार्ग अवलंबला आहे.
अनोख्या रिझ्यूमची रंगली चर्चा
अमन खंडेलवाल नावाच्या एका ट्विटर युजरने कर्मचाऱ्यांना आपल्याकडे आकर्षिक करण्यासाठी चक्क झोमॅटो डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हचे कपडे परिधान केले आणि आपला बायोडेटा पेस्ट्रीच्या बॉक्समध्ये भरून बंगळुरूमधील एका स्टार्टअपला दिला. अमनने नोकरीसाठी एक अनोखा पर्याय वापरल्याने त्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे मात्र काही लोक सुरक्षेच्या कारणास्तव हे चुकीचं असल्याचं बोलत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे अमनने स्वत:चा फोटो ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोत अमनने त्याचा बायोडेटा एका पेस्ट्रीच्या डब्ब्यामध्ये ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये दोन पेस्ट्री ठेवल्या आहेत. ज्याच्यानंतर हा अनोखा बायोडेटा त्याने बंगळुरूच्या स्टार्टअपला पाठवला.
पेस्ट्री बॉक्समध्ये लिहला भन्नाट मेसेज
दरम्यान, अमनने पाठवलेल्या पेस्ट्री बॉक्समध्ये एक बॉक्स पाहायला मिळत आहे. यामध्ये त्याने लिहले, "बहुतांश रिझ्यूम हे कचऱ्याच्या डब्ब्यात जातात मात्र माझा तुमच्या पोटामध्ये जाईल." खरं तर अमनने या फोटोशिवाय तो देखील फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये त्याने झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे कपडे घातले आहेत. झोमॅटोचे कपडे परिधान करून मी माझा बायोडेटा पेस्ट्रीच्या बॉक्समध्ये बंगळुरूच्या काही स्टार्टअपला पाठवला आहे, असे दोन्ही फोटो शेअर करताना अमनने लिहले.