शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला बऱ्याचदा नोकरीचं टेन्शन असतं. त्यातही चांगला पगार आणि मार्केटमध्ये नावाजलेली कंपनी मिळणं कठिण असतं. यामध्ये प्रत्येक शहर आणि देशामध्येही तफावत आढळून येते. म्हणजे एखाद्या देशात एकाच पोझिशनवर पण दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या दोन व्यक्तिंच्या पगारामध्येही फार फरक आढळून येतो. इंस्टीट्यूट फॉर मॅनेजमेंट डेवलप्मेंट (आईएमडी)ने जारी केलेल्या 'वर्ल्ड टॅलेंट रेटिंग-2017'च्या यादीत अशा काही देशांची नावं समाविष्ट करण्यात आली आहेत. जिथे पगार सर्वात जास्त आहे. जाणून घेऊयात जास्त पगार असणाऱ्या 5 देशांबाबत...
1. स्वित्झर्लन्ड
आईएमडीने दिलेल्या रेटींगनुसार, जगात सर्वात जास्त पगार हा स्विर्त्झलॅन्डमध्ये काम करणाऱ्या लोकांना मिळतो. रिपोर्टनुसार, सर्विस सेंटरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना सरासरी 92,625 डॉलर म्हणजेच जवळपास 63. 60 लाख रुपये इतका पगार मिळतो. याप्रमाणेच येथे महिन्याला सरासरी लोकं 5.30 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावतात. आठवड्याला येथे सरासरी 31 तास काम करावं लागतं.
2. अमेरिका
नोकरी आणि पगार यांच्यानुसार केलेल्या वर्गीकरणामध्ये अमेरिकेचा दुसरा क्रमांक लागतो. हा देश सर्वात चांगली ग्राहक सेवा आणि सर्वात चांगल्या लाइफस्टाईलसाठी ओळखला जातो. एका वर्षात येथे काम करणारे लोक सरासरी 42 लाख रूपये कमावतात. म्हणजेच त्यांचं मासिक उत्पन्न 3.47 लाख रुपये असते. येथे आठवड्यात कमीतकमी 34.4 तास काम करणं गरजेच असतं.
3. लग्जमबर्ग
यूरोपमधील लग्जमबर्ग हा लहान देश असला तरीही पगाराच्या बाबतीत हा देश तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे काम करणाऱ्या कर्माचाऱ्यांना वर्षाला सरासरी 40.11 लाख इतका पगार मिळतो. म्हणजेच महिन्याला 3.34 लाख रुपये कमावतात.
4. हाँगकाँग
हाँगकाँगवर जरी चीनचा प्रभाव असला तरीही इथले कर्मचारी चीनमधल्या कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त कमावतात. आईएमडीच्या रिपोर्टनुसार, या देशात काम करणारी लोकं वर्षभरात सरासरी 30.93 लाख रुपये कमावतात. त्यांची वार्षिक कमाई सरासरी 2.57 लाख रूपये असते.
5. जपान आणि जर्मनी
कर्माचाऱ्यांना जास्त पगार असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये जर्मनी आणि जपान जगातील पाचव्या क्रमांकावर आहेत. जपानमध्ये काम करणारे लोक सर्वात जास्त मेहनती असतात. येथे काम करणारी लोकं वर्षभरामध्ये 33.08 लाख रुपये कमावतात.