ठळक मुद्देकाहींना वाटतंय की 2017 आधार कार्ड लिंक करण्यात गेलं तर काहींना वाटतंय फ्लॉप चित्रपटांत.काहींना वाटतंय की हे वर्ष फार वेगानं गेलं आणि त्यांना याची गंमत वाटतेय.काहींना या वर्षातलं काही फ्लॉप आणि पडलेले चित्रपट आठवताहेत.
मुंबई : 2017 हे वर्ष संपायला अगदी दोन दिवसांचा अवकाश आहे. हे वर्ष तुम्हाला कसं गेलं हे सांगण्यासाठी सध्या ट्विटरवर एक हॅशटॅग वापरला जातोय. केवळ ५ शब्दात तुम्ही तुमचं वर्ष कसं गेलं हे हॅशटॅग वापरून सांगायचं आहे. #2017in5words असा हॅशटॅग वापरून अनेकांनी विनोदी पद्धतीनं त्याचं 2017 हे वर्ष स्पष्ट केलंय. यामध्ये सगळ्यात जास्त विरुष्काचं लग्न आणि आधार कार्ड लिंक करण्यातच 2017 हे वर्ष गेलंय असं काहींचं म्हणणं आहे. असेच काही विनोदी ट्विट्स आपण पाहुया.
2017 हे वर्ष सगळ्या कागदपत्रांना आधारकार्ड जोडण्यातच गेल्याचं काही जणांचं म्हणणे आहे.
2017 हे वर्षात फक्त सोमवारच होते वाटतं.
यावर्षात काय झालं? योगी आदित्यनाथ, जीएसटी, पद्मावती, बिटकॉईन आणि विरुष्का या गोष्टी मला आठवत आहेत.
वर्षभरात काय घडलं हे आठवत नसलं तरीही वर्षाच्या शेवटी फक्त विरुष्काचं लग्न झालं एवढंच आठवतंय, असं सांगणारी ही पोस्ट
यावर्षात सगळे बॉलिवूड चित्रपट कसे फ्लॉप गेले हे सांगणारं हे ट्विटर पोस्ट.
सिंगल असल्याचं दु:ख करत 2017 निघून गेल्याची खंत एका ट्विटकऱ्याने व्यक्त केलेय.
2017 वर्ष वेगाने निघून गेलं हे सांगण्यासाठी एकाने कलमेस स्टाईलचा वापर केला.
आणि हे काही नमुने -