अरे वाह रे वाह! पतीने हुंडा घेण्यास नकार दिला म्हणून रागावली पत्नी, तीन महिन्यांपासून माहेरीच मुक्काम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 12:44 PM2021-12-06T12:44:04+5:302021-12-06T12:55:00+5:30
पत्नीच्या या हट्टामुळे हे प्रकरण आता कोर्टात गेलं आहे. पतीने पत्नीला घरी बोलवण्यासाठी केस दाखल केली आहे. यावर कोर्टात विचार सुरू आहे.
मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) पती-पत्नीच्या भांडणाचं एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे. पत्नी या कारणाने रागावलेली आहे की, तिच्या घरून मिळालेली आणि इतर वस्तू घेण्यास पतीने नकार दिला. यावरून वाद इतका वाढला की, पत्नी सासरी जायला तयार नाही. पत्नीच्या या हट्टामुळे हे प्रकरण आता कोर्टात गेलं आहे. पतीने पत्नीला घरी बोलवण्यासाठी केस दाखल केली आहे. यावर कोर्टात विचार सुरू आहे.
ही घटना भोपाळमधील हायप्रोफाइल एरिया अरेरा कॉलनीतील आहे. पतीने या प्रकरणाची माहिती पुरूषांसाठी काम करणारी संस्था भाई वेलफेअर सोसायटीला दिली आहे. पतीने संस्थेला सांगितलं की, त्याचं घर अरेरा कॉलनी ई-६ मध्ये आहे. त्यांचं यावर्षीच १४ फेब्रुवारीला झालं होतं. लग्नाचे सर्व रिवाज पार पाडण्यासाठी त्याने एक रूपया सासरच्या लोकांकडून घेतला होता.
यानंतर सासरच्या लोकांनी त्याच्यासाठी कार आणि इतर वस्तू खरेदी केल्या होत्या. पण नवरदेवाने या वस्तू घेण्यास नकार दिला. याच कारणाने पत्नी नाराज झाली आणि ती तिच्या माहेरी परत आली. पत्नी गेल्या ३ महिन्यांपासून सासरी परत आली नाही. ती अडून बसली आहे की, जोपर्यंत पती तिच्या आई-वडिलांनी दिलेल्या वस्तू घेणार नाही, तोपर्यंत ती पतीसोबत राहणार नाही.
कोर्टात दोघांचंही काउन्सेलिंग केलं जात आहे. काउन्सेलरने पतीला समजावलं की, महिलेच्या घरून मिळालेल्या वस्तूंना त्यांनी हुंडा समजू नये. तुम्ही कोणतीही डिमांड केली नाही. सासरचे लोक त्यांच्या मुलीला वस्तू देत आहेत. हे सगळं तुमच्या पत्नीचं आहे. तिला यापासून वंचित करू नका. अजून पहिल्या काउन्सेलिंगमधून काहीही तोडगा निघालेला नाही. त्यांचं नातं टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.