शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

अरे वाह रे वाह! पतीने हुंडा घेण्यास नकार दिला म्हणून रागावली पत्नी, तीन महिन्यांपासून माहेरीच मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 12:44 PM

पत्नीच्या या हट्टामुळे हे प्रकरण आता कोर्टात गेलं आहे. पतीने पत्नीला घरी बोलवण्यासाठी केस दाखल केली आहे. यावर कोर्टात विचार सुरू आहे.

मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) पती-पत्नीच्या भांडणाचं एक अनोखं प्रकरण  समोर आलं आहे. पत्नी या कारणाने रागावलेली आहे की, तिच्या घरून मिळालेली आणि इतर वस्तू घेण्यास पतीने नकार दिला. यावरून वाद इतका वाढला की, पत्नी सासरी जायला तयार नाही. पत्नीच्या या हट्टामुळे हे प्रकरण आता कोर्टात गेलं आहे. पतीने पत्नीला घरी बोलवण्यासाठी केस दाखल केली आहे. यावर कोर्टात विचार सुरू आहे.

ही घटना भोपाळमधील हायप्रोफाइल एरिया अरेरा कॉलनीतील आहे. पतीने या प्रकरणाची माहिती पुरूषांसाठी काम करणारी संस्था भाई वेलफेअर सोसायटीला दिली आहे. पतीने  संस्थेला सांगितलं की, त्याचं घर अरेरा कॉलनी ई-६ मध्ये आहे. त्यांचं यावर्षीच १४ फेब्रुवारीला झालं होतं. लग्नाचे सर्व रिवाज पार पाडण्यासाठी त्याने एक रूपया सासरच्या लोकांकडून घेतला होता. 

यानंतर सासरच्या लोकांनी त्याच्यासाठी कार आणि इतर वस्तू खरेदी केल्या होत्या. पण नवरदेवाने या वस्तू घेण्यास नकार दिला. याच कारणाने पत्नी नाराज झाली आणि ती तिच्या माहेरी परत आली. पत्नी गेल्या ३ महिन्यांपासून सासरी परत आली नाही. ती अडून बसली आहे की, जोपर्यंत पती तिच्या आई-वडिलांनी दिलेल्या वस्तू घेणार नाही, तोपर्यंत ती पतीसोबत राहणार नाही.

कोर्टात दोघांचंही काउन्सेलिंग केलं जात आहे. काउन्सेलरने पतीला समजावलं की, महिलेच्या घरून मिळालेल्या वस्तूंना त्यांनी हुंडा समजू नये. तुम्ही कोणतीही डिमांड केली नाही. सासरचे लोक त्यांच्या मुलीला वस्तू देत आहेत. हे सगळं तुमच्या पत्नीचं आहे. तिला यापासून वंचित करू नका. अजून पहिल्या काउन्सेलिंगमधून काहीही तोडगा निघालेला नाही. त्यांचं नातं टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशJara hatkeजरा हटकेdowryहुंडा