शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

दुचाकीस्वाराची भिकाऱ्याला धडक; पोलिसांनी उचललं तेव्हा खिशात सापडले लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 10:44 AM

एका भिकाऱ्याकडे एवढी मोठी रोकड कुठून आली याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एका भिकाऱ्याचा अपघात झाला, मात्र त्याच्या खिशात पोलिसांना जे आढळले ते थक्क करणारे होते. शनिवारी एका दुचाकीस्वाराने भिकाऱ्याला धडक दिली. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याने भिकाऱ्याची ओळख पटवण्यासाठी त्याच्याकडे सापडलेले पाकीट तपासले. तेव्हा त्यात लाखो रुपये रोख आढळून आले. हे पाहून पोलीस अधिकारीही आश्चर्यचकित झाले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भिकाऱ्याच्या खिशातून ३.६४ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत असं पोलिसांनी सांगितले. या सर्व नोटा २००० रुपयांच्या होत्या. गोरखपूरमधील पिपराइच येथे राहण्यास असलेला ५० वर्षीय शरीफ बौंक असे या भिकाऱ्याचे नाव आहे. त्याला ऐकू येत नाही. तो मुकबधीर असल्याचे पोलिसांनी म्हटलं. एका भिकाऱ्याकडे एवढी मोठी रोकड कुठून आली याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

पोलिसांनी रोख रक्कम जप्त केलीया भिकाऱ्याने काही चोरी केली आहे का, या दृष्टिकोनातूनही पोलीस तपास करत आहेत. अहवालात तपास अधिकारी मनोज कुमार पांडे यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, एका मूकबधीर भिकाऱ्याचा अपघात झाला आणि त्याच्याकडून ३.६४ लाख रुपये जप्त करण्यात आले. या अपघातात भिकाऱ्याच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या ही रक्कम पोलिसांकडे आहे.

एसएचओने या घटनेची माहिती नसल्याचे सांगितले. एवढी मोठी रक्कम पोलीस ठाण्यात आल्यावर कळले. सध्या ही रक्कम पोलीस ठाण्यातील मालखान्यात जमा आहे. आतापर्यंत कोणीही पैशांवर दावा करण्यासाठी आलेले नाही. अपघातापूर्वी तो शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त दिसत होता असं अहवालात असे म्हटले आहे.