'पती सुंदर दिसत नाही' म्हणत माहेरी निघून गेली पत्नी; हाय कोर्टानं घेतली अशी अॅक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 03:48 PM2022-03-03T15:48:58+5:302022-03-03T15:50:11+5:30
पतीने पत्नीला अनेक वेळा बोलावण्याचा प्रयत्न केला. पण तिने पती सुंदर नाही, असे म्हणत जाण्यास नकार दिला. बिलासपूर उच्च न्यायालयाने या संदर्भात नुकताच महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
पत्नी आपल्या पतीला एक अशी गोष्ट बोलून माहेरी निघून गेली, जी क्वचितच घडते. लग्नानंतर काही दिवसांतच ती आपल्या माहेरी नुघून गेली आणि नंतर परतलीच नाही. पतीने पत्नीला अनेक वेळा बोलावण्याचा प्रयत्न केला. पण तिने पती सुंदर नाही, असे म्हणत जाण्यास नकार दिला. बिलासपूर उच्च न्यायालयाने या संदर्भात नुकताच महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
उच्च न्यायालयाने एका व्यक्तीचा घटस्फोटाचा अर्ज स्वीकारला. तसेच, पती आणि पत्नी यांच्यात शारीरिक संबंध असणे हा एक स्वस्थ्य वैवाहिक जीवनाचा महत्वाचा भाग आहे, असेही म्हटले आहे.
काय म्हणालं बिलासपूर उच्च न्यायालय -
लग्नानंतर शारीरिक संबंध न ठेवणाऱ्या जोडप्याचे वर्तन क्रूरतेच्या बरोबरीचे असल्याचे बिलासपूर उच्चन्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने याला महत्व देत संबंधित तुरुणाची घटस्फोटासंदर्भातील याचिका स्वीकारली आहे. न्यायालयाने म्हटले आहे, लग्नानंतर पती अथवा पत्नी, दोहोंपैकी कुणीही शारीरिक संबंधास नकार देत असेल तर, ती क्रूरता ठरेल.
माध्यमांतील वृत्तांनुसार, बिलासपूर येथे राहणाऱ्या एका तरुणाचे 15 वर्षांपूर्वी, 25 नोव्हेंबर 2007 रोजी लग्न झाले होते. बेमेतरा जिल्ह्यातील रहिवासी असलेली संबंधित महिला लग्नानंतर माहेरी निघून गेली. यादरम्यान पती तिला फोन करत सातत्याने घरी आणण्याचा प्रयत्न करत होता.