लग्नाच्या २७ वर्षांनंतर बिल गेट्स(Bill Gates) आणि मेलिंडा गेट्स (Melinda Gates) यांनी घटस्फोटाची घोषणा केली. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत होते. फार कमी लोकांना माहीत आहे की, मेलिंडा गेट्ससोबत लग्न करण्याआधी बिल यांची एक गर्लफ्रेन्ड (Bill Gates Girlfriend) होती. तिचं नाव होतं एन विनब्लॅड (ann winblad). लग्नावेळी बिल यांनी गर्लफ्रेन्डबाबत मेलिंडासोबत एक अजब करार केला होता.
१९९७ मध्ये टाइम मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत बिल यांनी याबाबत उल्लेख केला होता. बिल यांनी सांगितले होते की, १९९४ मध्ये लग्नावेळी त्यांनी मेलिंडासोबत एक एग्रीमेंट केलं होतं. ज्यानुसार ते दरवर्षी त्यांच्या जुन्या गर्लफ्रेन्डसोबत एकदा तरी लॉंग विकेंडवर जातील.
इतकंच नाही तर मेलिंडा यांना प्रपोज करण्याआधी बिल यांनी त्यांच्या गर्लफ्रेन्डकडून परवानगी घेतली होती. मुलाखतीत बिल यांनी सांगितले होते की, 'जेव्हा मेलिंडासोबत लग्नाचा विचार करत होतो तेव्हा मी सर्वातआधी विनब्लॅडला कॉल केला आणि तिची परवानगी घेतली. तिनेही मला यासाठी परवानगी दिली'.
विनब्लॅड एक सॉफ्टवेअर एक्सपर्ट होती आणि बिलपेक्षा ५ वर्षाने मोठी होती. वेगवेगळ्या शहरात राहत असल्याने विनब्लॅड आणि बिल नेहमीच व्हर्चुअल डेटींग करत होते. ते एकाच वेळी एखादा सिनेमा बघायचे आणि फोनवर याबाबत बोलत होते. त्यावेळी मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत विनब्लॅंड म्हणाली होती की, 'आम्ही आपले आणि जगाबाबतचे आमचे विचार एकमेकांना सांगता होतो'. (हे पण वाचा : Melinda-Bill Gates Love story : कशी होती बिल गेट्स यांची लव्हस्टोरी? इतक्या श्रीमंत माणसालाही आधी मिळाला होता नकार.....)
२००५ मध्ये सॅन फ्रान्सिस्को क्रॉनिकल वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विनब्लॅड म्हणाली होती की, 'जेव्हा मी बिलला डेट करायला सुरूवात केली होती तेव्हा तो मोठा व्यक्ती नव्हता. एक वेळ अशीही होती जेव्हा माझी आर्थिक स्थिती त्याच्यापेक्षा चांगली होती. आणि प्रत्येक गोष्टीसाठी मी पैसे देत होते. ही स्थिती फार कमी दिवसांसाठी होती. पण माझ्यासाठी ते यादगार क्षण आहेत'.
त्यावेळी बिल विनब्लॅडच्या प्रेमात इतके हरवले होते की, ते तिला खूश करण्यासाठी काहीही करायला तयार रहायचे. विनब्लॅडला खूश करण्यासाठी त्यावेळी त्यांनी नॉनव्हेज खाणंही बंद केलं होतं. बिल नेहमीच मोठा विचार करत होते आणि विनब्लॅड बिलच्या याच आत्मविश्वासाने प्रभावित झाली होती.
२०१३ मध्ये सिलिकॉन व्हॅली बिझनेस जर्नलला दिलेल्या एका मुलाखतीत विनब्लॅड म्हणाली होती की, 'एकदा बिल आणि मी बीचवर फिरण्यासाठी गेलो होतो. बिल तेव्हा म्हणाले होते की, ज्या दिवशी मला ५०० मिलियन डॉलर (३६,९८,०८,२५,००० रूपये) चा रेव्हेन्यू मिळणं सुरू होईल तेव्हा मला वाटेल की, मी आता योग्य मार्गावर आहे'. (हे पण वाचा : हे जगातले १० सर्वात महागडे घटस्फोट, सेटलमेंटच्या रकमा वाचून बोलती होईल बंद....)
विनब्लॅडने सांगितलं की, 'माझ्यावर बिलचा फार प्रभाव होता. मला तेव्हा वाटत होतं की, खरंच तो एक अशी कंपनी बनवू शकतो जी सॉफ्टवेअर उद्योगात सर्वात मोठी असेल. बिलकडून मला फार प्रेरणा मिळायची'. तेच बिल म्हणाले होते की, 'विनब्लॅड फारच गमतीदार स्वभावाची होती आणि कोणत्याही गंभीर क्षणाला ती सहजपणे आनंदी करत होती. ती फार स्मार्ट होती'.
बिल यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, 'विनब्लॅंडसोबत माझी सर्वात आवडती ट्रिप म्हणजे आम्ही आठवडाभर सांता बारबरामध्ये फिरत होतो. आम्ही बायोटेक्नॉलॉजी समजून घेण्यासाठी त्यासंबंधी कित्येक सिनेमे सोबत घेऊन गेलो होतो. बाहेर वातावरण मस्त होतं. पण फिरण्याऐवजी आम्ही आत बसून सिनेमे बघत राहिलो'.
१९८७ मध्ये बिल आणि विनब्लॅड यांचं ब्रेकअप झालं होतं. पण त्यानंतरही वर्षातून एकदा भेटण्याचा त्यांचा सिलसिला सूरूच राहिला. नंतर विनब्लॅडने एलेक्स क्लाइन नावाच्या पुरूषासोबत लग्न केलं.