एका महिलेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण या महिलेने घराची चावी आणि बिझनेस कार्ड स्वत:च्या शरीरावर इम्प्लांट करून घेतलं. त्यामुळे या महिलेला 'बायोनिक वुमन' म्हटलं जात आहे. ३१ वर्षीय विंटर म्राज ने सांगितले की, तिने तिच्या हातावर दोन चीप इम्प्लांट केल्या आहेत. ज्यातील एकाने ती घराचा दरवाजा उघडू शकते तर दुसऱ्याचा ती बिझनेस कार्ड म्हणून वापर करते. इतकेच नाही तर तिने हाताच्या बोटावर मॅग्नेट आणि दंडावर दोन फ्लॅश लाइटही इम्प्लांट केले आहेत. जगणं सोपं करण्यासाठी तिने हे असं केलंय.
मीडिया रिपोर्ट्नुसार, विंटर म्राज ही बायोनिक वूमन होण्याची प्रक्रिया तिच्या एका अपघातानंतरच झाली होती. तिने सांगितले की, एका अपघातात तिची मान, गुडघे आणि टाचांवर गंभीर जखमा झाल्या होत्या. दरम्यान तिच्यावर अनेक सर्जरी करण्यात आल्या. एका गुडघ्याची कॅप ३डी प्रिंटेड आहे. काही वर्षांनी तिने विचार केला की, जीवन सोपं करण्यासाठी शरीरात काही गोष्टी इम्प्लांट कराव्या.
विंटरने सांगितले की, हातावरील मायक्रोचीपने ती घराचा दरवाजा उघडू शकते. याचाच वापर ती ऑफिसमध्ये सिक्युरिटी कार्ड म्हणूनही करते. दुसऱ्या चीपचा वापर ती बिझनेस कार्ड म्हणून करते. विंटरला शरीरावर चीप लावण्याचा सल्ला तिच्या एका शेजाऱ्याने दिला होता.
तसेच तिने बोटावर मॅग्नेट इम्प्लांट करून घेतलं आहे. याने विंटर म्राजला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डची जाणीव होते, ज्याने ती वायरला स्पर्श करण्यापासून दूर ठेवलं जातं. ती सांगते की, यामुळे तिचं जीवन सोपं झालं आहे.