गर्भ धारण करण्यास स्त्रीचे शरीर सक्षम असते परंतु या पुरुषाने तर दुसऱ्यांदा गर्भ धारण केला आहे. पुरुष कसा गर्भ धारण करू शकतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल परंतु विज्ञानाने हेही शक्य झाले आहे. ही घटना आहे अमेरिकेतील ओरिगॉन येथील. ट्रिस्टन रीस आणि बिफ चाप्लॉ नावाच्या गे पित्यांसाठी ही दुसऱ्यांदा आनंदाची बातमी आहे. या जोडप्यातील ट्रिस्टनला दुसऱ्यांदा गर्भधारणा झाली आहे. तो आपला गे पती बिफ चॉप्लाच्या मुलाला जन्म देईल. याआधी २०१६ मध्ये त्याचा सहा महिन्यांच्या गरोदरपणानंतर गर्भपात झाला. यानंतर या जोडप्याने आपल्या जैविक मुलाची आशा सोडली होती परंतु आता त्यांना पुन्हा आशा निर्माण झाली आहे. ट्रिस्टन मुलाला जन्म देणार आहे. या जोडप्याने २ मुलांना दत्तकही घेतलेले आहे. २०११ मध्ये बिफची बहीण आणि तिच्या मित्रामधील वादानंतर या गे जोडप्याने त्यांच्या मुलांना दत्तक घेतले होते. आता या जोडप्याला आपल्या जैविक मुलाची ओढ लागली आहे. घरात नवा पाहुणा येणार या बातमीने हे जोडपे आनंदी आहे. अर्थात त्यांना त्यासाठी खूपच काळजी घ्यावी लागणार आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली ट्रिस्टन सध्या आहे कारण त्यांना आता कोणतीच जोखीम घ्यायची नाही. या जोडप्याने स्वत:चे छायाचित्रही प्रसिद्धीस दिले आहे.
पुरुष देणार मुलाला जन्म
By admin | Published: June 03, 2017 1:14 AM