(Image Credit : shoreshotpistolrange.com)
नॉर्वेमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसाठी सासऱ्याला बर्थ डे सरप्राइज देणं जीवावर बेतलं आहे. क्रिस्टोफर बर्गन ३७ वर्षांचा होता. तो मंगळवारी नॉर्वेहून फ्लोरिडाला ४ हजार मैलाचा प्रवास करून सासरे रिचर्ड डेनिसला भेटण्यासाठी आला होता. क्रिस्टोफर सासऱ्याला सरप्राइज देणार होता. त्यामुळे त्याने तो येत असल्याचं सासऱ्यांना सांगितलं नाही. पण ६१ वर्षीय सासऱ्याने चुकून त्याच्यावर गोळी झाडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
नेमकं काय झालं?
असे सांगितले जाते की, मंगळवारी सायंकाळी क्रिस्टोफर त्याच्या सासऱ्याच्या घरी पोहोचला आणि दरवाजा वाजवू लागला. त्याने सासऱ्यांना हे सांगितलेच नाही की, तो आलाय. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 'जेव्हा पहिल्यांदा समोरून दरवाजा वाजवला तेव्हा रिचर्ड आतच होता. थोड्या वेळाने घराचा मागचा दरवाजा वाजवला गेला. रिचर्डने घरातील लाइट लावले आणि बाहेर आले'.
झुडपात लपला होता क्रिस्टोफर
क्रिस्टोफर तिथे झुडपात लपला होता. तो जसा सासऱ्यांना सरप्राइज देण्यासाठी बाहेर आला, सासऱ्यांनी घाबरून बंदुकीतून गोळी झाडली. गोळी क्रिस्टोफरच्या छातीत लागल्याने, त्याचा जागीच मृत्यू झाला.
सासऱ्यावर कोणताच गुन्हा नाही
पोलिसांनी सांगितले की, चौकशीतून समोर आले की, ही घटना एक अपघात होती. अशात रिचर्डवर कोणताही गुन्हा ठेवला जाऊ शकत नाही. पोलिसांनी याबाबतच्या प्रेस कॉन्फरन्सचा व्हि़डीओ फेसबुकवर शेअर केलाय. या घटनेमुळे लोकांना धक्काही बसलाय आणि दु:खही होत आहे.