ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 27 - दिल्ली सरकारने लागू केलेल्या सम-विषम योजनेला विरोध दर्शवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे खासदार रामप्रसाद शर्मा यांनी चक्क घोड्यावरुन प्रवास केला. घोड्यावरुन प्रवास करत रामप्रसाद शर्मा आज संसदेत पोहोचले. या घोड्याला 'प्रदूषण मुक्त वाहन' असं नावही देण्यात आलं होतं. तर दुसरीकडे अभिनेता आणि भाजपा खासदार मनोज तिवारीदेखील सायकलवरुन संसदेत पोहोचले होते.
सम-विषम योजनेतून खासदारांना सूट देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे आमच्या कामात अडचणी येत असल्याचा दावा खासदारांनी केला आहे. सध्या अधिवेशन चालू आहे यामुळे दिल्ली सरकारने खासदारांना संसदेत पोहोचता यावं यासाठी बसची सेवा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र भाजपा खासदारांनी बसचा वापर करणे टाळले आहे. फक्त भाजपाचे उत्तरप्रदेशचे लोकसभा खासदार अंशूल वर्मा यांनी या बसमधून प्रवास केला आहे.
भाजपा खासदार विजय गोयल यांनीदेखील सम-विषम नियमांचं उल्लंघन केलं होतं. आपल्या कारवर योजनेविरोधात घोषणा आणि वृत्तपत्रातील कात्रणे लावून ते संसदेत पोहोचले होते. अभिनेते आणि भाजपा खासदार परेश रावल यांनीदेखील सम-विषम नियमाचं उल्लंघन केलं होतं. ज्यानंतर त्यांनी दिल्लीकरांची आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची माफी मागितली होती.
Seen in Parliament: BJP MP Vijay Goel's car #Oddevenpic.twitter.com/RG69VqpY0L— ANI (@ANI_news) April 27, 2016
BJP MP Manoj Tiwari comes to Parliament on a cycle, says he is following #OddEvenpic.twitter.com/8vtnjzLf3g— ANI (@ANI_news) April 27, 2016