अनेक लोक गुडलक चार्मसाठी किंवा असं म्हणूया की सूख-शांती आणि संपत्ती कमी होऊ नये म्हणून कासवाचं चित्र असलेली अंगठी घालतात. अनेकजण घरात कासव पाळतात. अशात मध्य प्रदेशाच्या बैतूलमध्ये एक दुर्मिळ प्रजातीचा कासव आढळला आहे. काळी पाठ असल्याने याला ब्लॅक शेड नावानेही ओळखलं जातं. आंतरराष्ट्रीय बाजारात या कासवा भरपूर डिमांड असल्याचंही बोललं जातं. वास्तुशास्त्रात या कासवाला गुडलक चार्म मानलं जातं. अशी मान्यता आहे की, याला घरात ठेवल्यावर सूख शांती आणि संपत्ती कधी कमी होत नाही.
तज्ज्ञांचं मत आहे की, या कासवाची खासियत ही आहे की, हा गवत खातो. सोबतच पाण्यात कमी राहतो आणि जमिनीवर जास्त चालतो. याच्या पायांना चार नखे असतात. १६ नखे असलेल्या या कासवाला लोक लकी मानतात. हा कासव सामान्यपणे फार कमी आढळतो. तसेच हा कासव घरात ठेवणे कायद्याने गुन्हा आहे.
बैतूलमध्ये हा काळा दुर्मिळ कासव उद्योगपती ब्रिज कपूर यांना मिळाला होता. तो त्यांना वन विभागाकडे सोपवला. ब्रिज कपूर म्हणाले की, पावसादरम्यान त्यांना पाण्यात वाहताना दिसला. ते म्हणाले की, १० दिवस कासवाला घरात ठेवल्यावर आम्हाला वाटलं की, त्याचा इथे योग्य विकास होणार नाही. घरात काळी पाठ असलेला कासव ठेवल्याने सूख-शांती, धन येतं, हा फार शूभ मानला जातो. पण तरी सुद्धा आम्ही हा कासव वन विभागाकडे सोपवला. तेच याचा योग्य सांभाळ करू शकतात.
बैतूल वनरक्षक चंद्रशेखर म्हणाले की, कासव ब्रिज कपूर यांच्या घरातून मिळाला आहे. त्यांना हा पावसादरम्यान सापडला होता. त्यांनी १० दिवस त्याचा सांभाळ केला. पण नंतर त्यांना हा कासव वन विभागाकडे सोपवला. हा दुर्मिळ कासव नदीत सोडला जाणार आहे.
कौतुकास्पद! स्वत: पूराच्या पाण्यात उतरत आमदाराने वाचवले लोकांचे जीव
प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंडनं मागितला चंद्राचा तुकडा; त्यानं थेट १ एकर भूखंडच विकत घेतला