Black Salt Making : चिमुटभर मिठाचे जेवणाची टेस्ट वाढते. पण मीठ तयार करण्याचं काम फारच आव्हानात्मक असतं. मग ते पांढरं मीठ असो वा काळं मीठ. दोन्ही तयार करण्यासाठी मजुरांना खूप मेहनत घ्यावी लागते. त्यांना चटके सोसावे लागतात. भारत जगातील तिसरा मिठाचा सगळ्यात मोठा उत्पादक देश आहे. गुजरातपासून ते राजस्थान, तामिळनाडू, महाराष्ट्र इथे तुम्हाला मिठागरे दिसतात.
पण तुम्ही कधी काळं मीठ कसं बनवतात हे पाहिलं का? काळ्या मिठाबाबत अनेक रहस्यमय गोष्टी आहेत. काही लोक सांगतात की, काळं मीठ पाकिस्तानातून येतं तर काही म्हणतात की ते डोंगरातून आणलं जातं. पण अनेकांना हे माहीत नाही की, हे मीठ भारतातच बनवलं जातं. याचा एक व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
कसं तयार केलं जातं काळं मीठ?
काळं मीठ तयार करणं काही सोपं काम नाही. हे तयार करण्यासाठी मेहनतीसोबतच धोकाही खूप असतो. या व्हायरल व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, सगळ्यात आधी एका ट्रकमधून मिठाचे गडे काढले जातात. हे पांढरं असतं. जे जयपूरहून आणलं जातं. आधी भट्टी पेटवली जाते. त्यात कोळसा टाकला जातो.
मग या भट्टींवर काही मडके एका लाईनने ठेवले जातात आणि वरून कोळसा टाकला जातो. नंतर मडक्यांमध्ये पांढरं मीठ भरलं जातं. सोबतच बदामाची सालही टाकली जाते. ज्यामुळे मिठाचा रंग बदलतो. नंतर विटांच्या मदतीने मडके झाकले जातात. 24 तास ही मडकी अशीच असतात. नंतर ही मडकी काढली जातात. ती थंड झाल्यावर तोडून त्यातून काळं मीठ बाहेर काढलं जातं.
हा व्हिडीओ इंस्टाग्राम पेज Foodie Incarnate ने पोस्ट केला होता. त्यांनी कॅप्शनला लिहिलं होतं की, मेकिंग ऑफ ब्लैक सॉल्ट... असं तयार केलं जातं काळं मीठ. या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाख 38 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. 17 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
यावर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं की, बदामाची साल नाही तर बाभळीची साल टाकली जाते. दुसऱ्याने लिहिलं की, चपलेखालचं मीठ कोण खाणार. तिसऱ्याने लिहिलं की, पहिल्यांदाच पाहिलं की, काळं मीठ कसं तयार केलं जातं.