(Image Credit : www.youngisthan.in)
रस्त्यावरुन एखादी मुलगी जात असेल तर त्या मुलीची छेड काढण्यासाठी मुलं शिटी वाजवतात. काही मुलं तर थेट घाणेरड्या कमेंटही करतात. पण आता रस्त्यावरुन जात असलेल्या मुलींना पाहून शिटी वाजवणे मुलांना चांगलंच महागात पडू शकतं. कारण आता जर मुलींना पाहून कुणी शिटी मारली तर पोलीस मुलांकडून ६० हजार रुपये वसूल करणार आहे.
फ्रान्स सरकारने हा नियम केला असून शिटी मारल्यास आता ६० हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. रोडरोमिओंना आळा घालण्यासाठी फ्रान्स सरकारने हा नियम तयार केला आहे. यानुसार आता मुलींवर घाणेरड्या कमेंट करणे, त्यांचा पाठलाग करणे, त्यांच्याकडे पाहून घाणेरडे हावभाव करणे, शिटी वाजवणे मुलांना महागात पडणार आहे. आता शिटी वाजवणेही गुन्हा ठरवण्यात आला आहे.
फ्रान्समध्ये महिलांच्या सुरक्षेबाबत आता कठोर पावले उचलली जात आहे. त्यानुसारच हा नियम करण्यात आला आहे. महिलांची छेडछाड रोखण्यासाठी शिटी वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रो हे महिलांना सुरक्षा देण्यासाठी वेगवेगळ्या उपया योजना करत आहेत. फ्रान्समध्ये काही महिन्यांपूर्वी एक सर्व्हे करण्यात आला असून या सर्व्हेनुसार, देशातील महिलांना सार्वजनिक जागांवर विनयभंगाचा सामना करावा लागतो. यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त महिलांचं म्हणनं होतं की. त्यांच्यासोबत पहिल्यांगा छेडछाड झाली तेव्हा त्या १८ वर्षांच्या होत्या.
याचा अर्थ इथे अनेकांकडून कमी वयाच्या मुलींना शिकार केलं जात आहे. त्यामुळेच फ्रान्समध्ये महिलांच्या सरक्षेसाठी कठोर पावले उचलली आहेत.