रशियातील(Russia) काही भटक्या कुत्र्यांची स्थिती बघून स्थानिक लोक हैराण झाले आहेत. कारण या कुत्र्यांची त्वचा अचानक पूर्णपणे निळ्या रंगाची(Blue Dog) झाली आहे. सोशल मीडियावर या कुत्र्यांचे फोटो व्हायरल(Social Viral) झाले आहेत. हे कुत्रे रशियातील Dzerzhinsk मध्ये दिसले होते. असे मानले जात आहे की, केमिकल रिअॅक्शनमुळे त्यांच्या रंगात हा बदल बघायला मिळत आहे.
या शहरात सोवियत संघ काळातील एक केमिकल प्लांट आहे. ही एक फार मोठी केमिकल फॅसिलिटी होती. ज्यात हायड्रोसोनिक अॅसिड आणि प्लेक्सी ग्लास बनवले जात होते. असे मानले जात आहे की या प्लांटमधून निघालेल्या केमिकल कचऱ्यामुळेच कुत्र्यांचा रंग बदलला आहे. ही फॅक्टरी सहा वर्षाआधी बंद पडली होती.
तेच या केमिकल प्लांटचे मालक आंद्रे यांनी सांगितले की, कुत्रे निळ्या रंगांचे झाल्याचे फोटो फेक आहेत. त्यांनी असा दावा केला की, हा प्रकार फक्त गोंधळ करण्यासाठी आणि लोकांना मूर्ख बनवण्यासाठी केलाय. ते असंही म्हणाले की, खरंच कुत्र्यांची ही स्थिती झाली असेल तर ते नक्कीच कॉपर सल्फेट केमिकलच्या संपर्कात आले असतील.
कॉपर सल्फेट शरीरावर लावल्याने फार जळजळ होते. ज्याने खाजेची समस्या होऊ शकते. हे फोटो केमिकल प्लांटच्याय आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी क्लीक केले होते. याआधीही काही वर्षांपूर्वी रशियात अशा घटना समोर आल्या आहेत. त्यावेळीही जनावरांचा रंग सामान्यापेक्षा वेगळा झाला होता. आता या प्रकरणाची प्रशासनाकडून चौकशी करण्यात येत आहे.