लहान जागेत मोठी स्वप्न पाहणारे खूप लोक असतात. पण हातांच्या बोटांवर मोजण्या इतकेच लोक आपली स्वप्न सत्यात उतरवतात. मुंबईतल्या बीडीडी चाळीतल्या १८० स्क्वेअर फुटांच्या घरात राहत असलेल्या मुलीनं एक स्वप्न पाहिलं आणि हेच स्वप्न सत्यात उतरवून दाखवलं. नासा या जागतिक संशोधन संस्थेत काम करण्याची मुंबईच्या सुवर्णा कुराडेची इच्छा होती. “माहिती आणि तंत्रज्ञानावर माझं प्रचंड प्रेम आहे. त्यात जे काही शिकता ते सगळं शिकण्याचा प्रयत्न होता. याचेच फलित म्हणून मी आज नासात आहे” असं सुवर्णा म्हणाल्या.
सुवर्णा यांनी मुंबईतल्या बीडीडी चाळीत राहून मुंबई महापालिकेच्या शाळेतून शिक्षण घेतलं. सुवर्णा यांना गुरु म्हणून मारुती शेरेकर भेटले. तेव्हा त्यांच्याही शिक्षकी पेशाची सुरुवात झाली होती. त्यांच्यासोबतच धनाजी जाधव यांनीही सुवर्णामधील कौशल्या जाणले या दोघांनीही तिला अतिरिक्त शिकवणी देण्यास सुरुवात केली. शेरकर यांनी इनडायरेक्ट स्पीच हे इंग्रजी व्याकरणातील प्रकरण शिकवले तिला इंग्रजीच्या पुस्तकातील या व्याकरण प्रकाराची जी उदाहरणं सापडतील ती लिहून आण असं सांगितलं होतं. सुवर्णाने तेव्हा १०० वाक्यं लिहून आणली तेव्हाच तिच्यातली अभ्यास करण्याची जिद्द शिक्षकांना दिसली होती.
१९९५ मध्ये सुवर्णाने दहावीच्या परीक्षेत ८८.१४ टक्के गुण मिळवले. विशेष म्हणजे इंग्रजी विषयात सुवर्णाला ९० गुण मिळाले होते. यानंतर याच जिद्दीने पुढे जात सुर्वणा यांनी यश मिळवलं. सुवर्णा यांनी सांगितले की, ''कोणतीही गोष्ट कधीही कमी लेखू नका, मी स्वतःशीच स्पर्धा करत राहिले त्यामुळे मी नासामध्ये काम करते आहे. असं असलं तरीही मला आणखी खूप शिकायचं आहे. पालिकेच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी असो किंवा अन्य कोणत्याही शाळेतील विद्यार्थी प्रत्येकांनी आपल्या मनातला विद्यार्थी सतत जागृत ठेवल्यास यश नक्कीच मिळतं''
त्रिवार सलाम! महामारीमुळे कोरोना योद्धांची होतेय दयनीय अवस्था; ८ महिन्यांनी बदलला नर्सचा चेहरा
पुढे त्यांनी सांगितले की, ''मी वांद्रे पॉलिटेक्निकमधून इंजिनीअरिंग डिप्लोमा पूर्ण केला. मग तेथेच काही काळ नोकरी करीत कम्प्युटर इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले. विवाहानंतर त्या अमेरिकेत स्थायिक झाले. नोकरी करतानाही शिक्षण सुरू होते. विविध व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या पातळी पूर्ण केल्या. क्लाउड आणि नेटवर्किंगवर माझे खूप प्रेम आहे,'' असं ही सुवर्णा म्हणाल्या.
वावर हाय तर पावर हाय! १० वी पास बाईनं शेतात बनवलं जबरदस्त आयलँड; आता होतेय लाखोंची कमाई