होता. असे सांगितले जात आहे की, यावेळी रायनने १८० किलो वजन उचललं होतं. व्हिडीओत बघितलं जाऊ शकतं की, रायन बेंच प्रेस करत असताना वजन वरच्या बाजूने नेत होता, पण अचानक त्याच्या उजव्या हाताच्या मांसपेशी फाटल्या आणि रायन वेदनेने जोरात ओरडला.
दरम्यान रायनचा कोच लॅरीने त्यांच्या उपचारासाठी पैशांची मागणी केली होती. एका फंड पेजच्या माध्यमातून ही मागणी केली होती. त्यातून पाच दिवसात जवळपास ३८ हजार डॉलर्स म्हणजे २७ लाख रूपये जमा झाले होते. रायन हा इंग्लंडचा आहे आणि दुबईमध्ये त्याचा इन्शुरन्स त्याचे मेडिकल बिल्स कव्हर करू शकत नव्हता.
रॉयनची आता सर्जरी झाली आहे. त्याने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, ही सर्जरी १ तास चालणार होती. पण दुर्दैवाने ४ तास चालली. मी सर्जरीआधी फार घाबरलेला होतो आणि मला भिती होती की, माझं बॉडीबिल्डींग करिअर सुरू होण्याआधीच संपू नये.
रायन इन्स्टाग्रामवर लिहिले की, मला अजूनही फार वेदना होत आहे. डोक्यापासून पायापर्यंत माझं शरीर सूजलं आहे. मला माझा हात परत मिळवण्यासाठी एक गंभीर प्लॅन फॉलो करावा लागेल. हे सगळं हळूहळू होईल.