क्वीटो – जगात सर्वात घट्ट आणि मोठं नातं आहे ते म्हणजे मैत्रीचं. तुम्ही असे अनेक व्हिडीओ, फोटो पाहिले असतील त्यात जिगरी मैत्रीची उदाहरण पाहायला मिळतील. अलीकडेच काही मित्रांच्या ग्रुपवर एक फोटो समोर आला आहे. ज्यात एका मित्राचा मृतदेह दुसरे मित्र बाईकवरुन शहरभर फिरवत आहेत. त्यासाठी मित्रांनी जे केले ते ऐकून तुम्ही हैराण व्हाल. हा मृतदेह चक्क दफनभूमीतून खोदून बाहेर काढण्यात आला आहे.
शवपेटीतून मृतदेह बाहेर काढला
एरिक सेडेनोच्या मित्रांचा दावा आहे की, इक्वाडोरमध्ये मित्राच्या अंत्यसंस्कारासाठी मृतदेह शवपेटीतून बाहेर काढण्याची परवानगी त्याच्या आई वडिलांनी दिली होती. मीडिया रिपोर्टनुसार, जवळपास ७ युवकांना एका मोटारसायकल भोवती पाहण्यात आले. ते एका मृतदेहाला बाईकवर बसवून शहरात फिरवत होते. मृतदेहाला बाईकवर बसवून बिनधास्त बाईक राईड करताना अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
अनोख्या पद्धतीने मित्राला दिला अखेरचा निरोप
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, हे युवक त्यांच्या मित्राला श्रद्धांजली देऊ इच्छित होते. ही त्यांच्या मृत्यू झालेल्या मित्राची इच्छा होती. याच प्रकारे मित्रांनी त्याला निरोप दिला. त्याच्या शवपेटीवर दारुने शिंपडण्यात आले. मागील आठवड्यात एरिकचा मृत्यू झाला होता. जेव्हा एरिक त्याच्या नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला जात होता तेव्हा कुणीतरी त्याच्यावर गोळी झाडली. तेव्हा एरिकचा मृत्यू झाला. तो २१ वर्षाचा होता.
पोलीस म्हणाले की, या शहरात पहिल्यांदाच असं घडलं आहे. ही अजब आणि चुकीची पद्धत आहे. परंतु पोलिसांनी अद्याप कुणालाही ताब्यात घेतले नाही. किंवा या घटनेचा तपासही सुरु केला नाही. कारण अंत्यसंस्कार एक खासगी कार्यक्रम मानला जातो. आणि या घटनेविरोधात कोणीही पोलिसांकडे तक्रार केली नाही. विशेष म्हणजे जगातील काही भागात मृतांचे नातेवाईक आणि मित्रांसाठी मृतदेह शवपेटीतून बाहेर काढण्याची प्रथा आहे. दक्षिण सुलावेसी येथील उंच भागात वर्षातून एकदा मृत व्यक्तीला त्याच्या नातेवाईकांना आणि मित्रांना भेटवले जाते. ३ दिवस हा उत्सव असतो. यात लहान मुलं, चिमुकल्यांचे मृतदेहही काढले जाते.