Model Phone Auction: जगात दरवेळी काही ना काही नवीन गोष्टी घडत असतात. लोक नवीन फोन विकत घेतात तेव्हा त्यांना वाटते की आधीच्या फोनची किंमत त्यांना मिळावी. किंमत मिळत नसली तरी किमान एक्सचेंज ऑफरमध्ये फोन मिळवण्याची अनेकांची खटपट चालू असते. अनेक वेळा लोक नवा फोन घेतल्यावर जुना फोन घरात ठेवतात आणि तो फोन असाच खराब होतो. पण एका मॉडेलने मात्र थेट आपला फोन विकायला काढला. खरं तर, तिने तो फोन विकणार असल्याची घोषणा केली होती. पण त्यासोबतच तिने असं काही सांगितलं की तिचा फोन विकत घेण्यासाठी चक्क बोली लागायला सुरूवात झाली. (Trending Story)
नक्की काय आहे प्रकरण-
खरं तर ही घटना थायलंडमधील एका मॉडेलशी संबधित आहे. 'The Thaiger.com'च्या रिपोर्टनुसार, या मॉडेलचे नाव कानोक्यादा जीतमपोन आहे. रिपोर्टनुसार, मॉडेलने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या फोनच्या विक्रीची घोषणा करताच फोन विकत घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. त्यामागचे कारणही तितकेच खास आहे. कारण मॉडेल असेही जाहीर केले की त्या फोनची बोली जिंकणाऱ्याला त्या फोनमधील मॉडेलचे प्रायव्हेट फोटोस देखील मिळतील. ते डिलीट केले जाणार नाहीत. त्यामुळे लोकांनी फोनच्या किमतीपेक्षा कितीतरी पट जास्त पैशांची बोली लावली.
रिपोर्टनुसार, प्रत्यक्षात या मॉडेलला नवीन फोन घ्यायचा होता आणि तिने विचार केला की काहीही करून जुना फोन महागड्या किमतीत विकायचा. यानंतर तिने घोषणा केली की फोन खरेदी करणार्याला या मॉडेलचे प्रायव्हेट फोटोज देखील मिळतील. यानंतर लोकांनी फोन विकत घेण्यासाठी बोली लावायला सुरूवात केली. मॉडेलच्या एका चाहत्याने फोन विकत घेण्यासाठी आठ लाख रुपये देण्याचे मान्य केले.
मिळालेल्या माहितीनुसार, मॉडेलकडे जुना आयफोन असून ती आता आयफोनचे नवीन व्हर्जन घेण्याचा विचार करत आहे. सोशल मीडियावर फोनच्या विक्रीची घोषणा करताना मॉडेलने लिहिले की फोनसोबतच ती तिचे फोटो आणि व्हिडिओचे कलेक्शनही फोन खरेदी करणाऱ्याला देणार आहे. त्यामुळे या फोनची बोली लागण्यास सुरूवात झाली. अद्यापही तो फोन विकण्यात आलेला नाही. त्यामुळे फोन नक्की किती रुपयाला विकला जाणार याची चर्चा आहे.