एका महिला बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना भलं मोठं सरप्राईझ दिलं असून आनंदाचा धक्का दिला. एका मिटिंगमध्ये बोनस देण्याची घोषणा केली आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना तब्बल 80 लाखांहून अधिक बोनस दिला आहे. सध्या या बॉसची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. गीना राइनहार्ट असं या महिला बॉसचं नाव आहे. त्या Hancock Prospecting नावाच्या मायनिंग आणि अग्रीकल्चरल कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षा आहेत.
गीना राइनहार्ट यांच्या वडिलांनी ही कंपनी स्थापन केली होती. एका रिपोर्टनुसार, राइनहार्ट या 34 बिलियन डॉलरच्या संपत्तीसह ऑस्ट्रेलियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. गीना यांनी कंपनीच्या दहा कर्मचाऱ्यांना अचानक बोनस देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी प्रत्येकाला 82 लाख दिले असून याला ख्रिसमस बोनस असं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी गीना यांनी कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी घोषणा करणार असल्याचं म्हटलं होतं. पण बोनसबाबत काहीही सांगितलं नाही.
अचानक एवढी मोठी रक्कम बोनस म्हणून मिळाल्य़ाने कर्मचारी हैराण झाले आहेत. राइनहार्ट यांनी कंपनीची एक मिटिंग बोलावली आणि बोनस मिळालेल्या दहा कर्मचाऱ्यांच्या नावाची घोषणा केली. हे ऐकताच कर्मचारी सुखावले. सुरुवातीला त्यांचा विश्वासच बसला नाही. बोनस मिळलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एक कर्मचारी तर फक्त तीन महिन्यांपूर्वीच कंपनीत रुजू झाला होता. या घटनेची आता चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"