शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
2
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ
3
अजित पवार गटात अस्वस्थता, आमदारांच्या संख्येपेक्षाही कमी जागांची भाजपकडून ऑफर, शिंदेंना झुकते माप
4
FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आता मिळणार अधिक रिटर्न; 'या' बँकांनी वाढवले व्याजदर, पाहा संपूर्ण लिस्ट
5
समृद्धीवरील टोलचे कंपनीचे कंत्राट रद्द? नियमांचे उल्लंघन; एमएसआरडीसीकडून नोटीस जारी
6
"फक्त जपणूक नाही तर..."; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर लेखक-दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अचानक धनलाभ होईल, सुखद बातमी मिळण्याची शक्यता
8
मराठीच्या कलशाची अभिजात घटस्थापना; निवडणुकांच्या तोंडावर मोठा निर्णय
9
सहकारी संस्थांचे बिगुल वाजणार, निवडणुका घ्या; सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा आदेश 
10
नवरात्रात पाऊस, नंतर थंडीने भरेल हुडहुडी; काय आहे हवामानाचा अंदाज... 
11
जातीच्या आधारावर भेदभाव करणाऱ्या तरतुदी काढा; महाराष्ट्रासह काही राज्यांच्या तुरुंग नियमावलीत होणार सुधारणा
12
ईशा फाउंडेशन प्रकरणी पोलिस चौकशीस स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
13
स्कूल व्हॅन चालकाचा दाेन बालिकांवर अत्याचार; पुण्यात बदलापूरसारखी घटना
14
राजकीय वर्चस्व असलेला समाज मागास ठरू शकत नाही; मराठा आरक्षण; याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद
15
‘माझी ड्यूटी संपली, मी विमान उडवणार नाही’; पुण्याहून जाणारे विमान ५ तास लटकले
16
सध्याच्या अराजकाविरोधात आता जनतेच्या न्यायालयातच लढाई; उद्धव ठाकरेंचे दसरा मेळाव्याचे संकेत
17
मुख्यमंत्रिपदासाठी ते दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरत आहेत! मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
19
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
20
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये

कंटाळा, आंदोलन की व्यायाम?; माणसं पुन्हा चालायला लागली चार पायांवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 9:07 AM

आधी चार पायांवर चालणारा माणूस आता दोन पायांवर चालायला लागला आहे. दोन पायांवर चालणं हे मानवाचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं.

माणूस कधी चालायला लागला? माणसाची उत्क्रांती कशी, केव्हा झाली? असं म्हणतात, की माणूस आधी नरवानर होता. याच नरवानरापासून मानवाची उत्पत्ती झाली आहे. हा नरवानर, आपला पूर्वज आता अस्तित्वात नाही, पण आधुनिक मानवाची उत्क्रांती त्याच्यापासूनच झाली आहे. मानवही आधी चार पायांवर चालायचा. तिथून दोन पायांवर चालण्याच्या मानवाच्या प्रवासाला लाखो वर्षं लागली.  मानवाच्या उत्क्रांतीचा हा कालखंड अतिशय दीर्घ आहे. उत्क्रांतीच्या या प्रक्रियेला तब्बल साठ लाख वर्षांचा कालावधी लागला आहे. 

आधी चार पायांवर चालणारा माणूस आता दोन पायांवर चालायला लागला आहे. दोन पायांवर चालणं हे मानवाचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. यामुळे मानवाचे पुढचे दोन ‘पाय’ म्हणजेच हात इतर कामं करण्यासाठी मोकळे झाले आणि माणूस अधिकच उत्क्रांत होत गेला. एकाच वेळी दोन पाय आणि दोन हातांचा उपयोग मानवाला करता यायला लागल्यामुळे त्याच्या हालचालीत सुलभता तर आलीच, पण त्यामुळेच इतर अनेक कौशल्यंही मानवाला अवगत करता आली, जी इतर प्राण्यांना करता आली नाहीत. त्यामुळेच मानवाचा मेंदूही झपाट्यानं प्रगत होत गेला. दोन पायांवर चालण्याची ही उत्क्रांती मानवामध्ये साधारण ४० लाख वर्षांपूर्वी झाली. त्यानंतर मानवाची इतर वैशिष्ट्ये विकसित होत गेली. 

आता मानवाच्या उत्क्रांतीचा हा इतिहास पुन्हा सांगायचं कारण काय? - तर जगात काही ठिकाणी माणसं आता पुन्हा आपल्या उत्क्रांतीपूर्व काळात जाऊ लागली आहेत की काय, अशी शंका वाटावी अशा घटना घडू लागल्या आहेत. काही ठिकाणी माणसं आपलं नेहेमीचं दोन पायांवर चालणं सोडून पुन्हा ‘चार पायांवर’ चालायला लागली आहेत. यातलं प्रमुख ठिकाण म्हणजे चीन ! 

चीनमध्ये सध्या एक नवीनच ट्रेंड आला आहे. विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ! हे कॉलेजवयीन तरुण कॉलेजच्या आवारात, मैदानावर मोठ्या संख्येनं चार पायांवर चालताना, गुडघे टेकून रांगताना दिसून येत आहेत! बिजिंगमधील विद्यापीठांतील अनेक विद्यार्थी असे चार पायांवर रांगत असल्याचं पाहिल्यावर अनेकांना आश्चर्य वाटलं. पण फक्त बिजिंगमध्येच नाही, चीनमध्ये इतरही अनेक ठिकाणी, विशेषत: महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थी असे रांगताना दिसून येत आहेत. चीनमधील ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ त्याचबरोबर इतरही अनेक वृत्तपत्रं आणि माध्यमांनी या घटनेला विस्तृत प्रसिद्धी देतानाच विद्यार्थ्यांच्या या विचित्र वागणुकीवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. चीनच्या सोशल मीडियावरही तरुणांमधील हा नवा ट्रेंड खूपच व्हायरल होतो आहे. ठिकठिकाणच्या विद्यार्थ्यांचे रांगतानाचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत आणि त्याला तुफान प्रसिद्धीही मिळते आहे. ‘चतुष्पाद’ किंवा ‘चार पायांची चळवळ’ म्हणून या घटनेचं वर्णन केलं जात आहे. 

मांजरी, मगरी, अस्वलं आणि इतर प्राण्यांच्या हालचालींपासून या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असावी आणि या प्राण्यांसारखं आपणही जगून पाहावं अशी स्फूर्ती त्यांनी घेतली असावी असं म्हटलं जात आहे. हजारो विद्यार्थ्यांनी असं अचानक चार पायांवर येण्याचं नक्की कारण तरी काय? केवळ मजा म्हणून, काहीतरी वेगळं करून पाहायचं म्हणून की आणखी काही?.. - त्याबाबत अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या या कृतीचं कारण काहीही असलं तरी तज्ज्ञांचं म्हणणं आहे, विद्यार्थ्यांची ही ‘चतुष्पाद’ हालचाल त्यांच्या आरोग्यासाठी मात्र खूपच उपयुक्त आहे. चार पायांवर चालल्यामुळे तुमच्या शरीराचं संतुलन अधिक उत्तम पद्धतीनं होतं. तुमच्या शरीराची हालचाल वाढते. संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. रस्त्यावर रांगत जाणं आणि रांगण्याच्या स्थितीतून पुन्हा सरळ उभं राहण्याच्या स्थितीत येणं, या स्थितीतून पुन्हा रांगण्याच्या स्थितीत जाणं.. या गोष्टी तुम्ही स्वत:च थोडा वेळ करून पाहिल्या तर तुम्हाला किती तरतरी येते, हे तुमचं तुम्हालाच लक्षात येईल, असं आरोग्य अभ्यासकांचं म्हणणं आहे.

कंटाळा, आंदोलन की व्यायाम? विद्यार्थी असं का वागताहेत, याबाबत काहींचा अंदाज आहे, चीन सरकारच्या लॉकडाऊनच्या धोरणाला विरोध म्हणून विद्यार्थ्यांचं हे मूक आंदोलन आहे. काहींचं म्हणणं आहे, लॉकडाऊनमुळे सतत घरात राहावं लागलेल्या, बोअर झालेल्या तरुणांनी कंटाळा घालविण्यासाठी योजलेली ही युक्ती आहे, तर अर्थातच काहींचं म्हणणं आहे, आपलं शरीरस्वास्थ्य टिकवण्यासाठी विद्यार्थी करीत असलेला व्यायामाचा हा एक नवा प्रकार आहे ! काहीही असलं तरी चिनी विद्यार्थ्यांच्या या कृतीनं अख्ख्या जगभराचं लक्ष त्यांनी पुन्हा आपल्याकडे खेचून घेतलं आहे हे नक्की !