प्रत्येक कर्मचाऱ्याला दर आठवड्याला सुट्टी मिळते. कुणाला एक सुट्टी मिळते तर कुणाला दोन सुट्ट्या मिळतात. सुट्टी हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा अधिकार आहे. पण, कधी-कधी बॉस कर्मचाऱ्याला सुट्टीच्या दिवशीही कामासाठी बोलवतात. अशाच एका बॉसला कर्मचाऱ्याने थेट उत्तर दिले. त्यांच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट सध्या व्हायरल होत आहेत. त्या कर्मचाऱ्यानेच या संभाषणाचे स्क्रीनशॉट Reddit वर शेअर केले. त्या कर्मचाऱ्याने सांगितले की, मी केवळ अविवाहित असल्यामुळे बॉसने मला सुट्टीच्या दिवशी कामावर बोलवलं.
'तू मेसेज वाचला आहेस, वेळेवर कामावर ये'
कर्मचाऱ्याने संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मला हे पाहून धक्का बसला आहे. मला आशा आहे की, माझ्या निर्णयामुळे मला याचा पश्चात्ताप होणार नाही. मला माझे काम आवडते, पण व्यवस्थापन उद्धट आहे.' स्क्रीनशॉटमध्ये बॉस म्हणतो की, उद्या सकाळी 7 वाजता कामावर ये. कर्मचारी मेसेज वाचून उत्तर देत नाही. यावर बॉसचा पुन्हा मेसेज येतो, तू मेसेज वाचला आहेस, सकाळी 6.15 वाजता ऑफिसमध्ये भेटू.
'तू अविवाहित आहेस...'यानंतर कर्मचारी उत्तर देतो, मी उद्या येऊ शकणार नाही, ब्रायनला यायला सांगा. धन्यवाद. यावर बॉस म्हणतो, ब्रायन विवाहित आहे आणि त्याला मुले आहेत, त्यामुळे इतक्या अर्जंट मी त्याला यायला सांगू शकत नाही. तू अविवाहित आहेस, तु का येत नाहीस?
'काय प्लान आहे तुझा?'
यावर त्या व्यक्तीने उत्तर दिले - मला आठवड्यातून एकच सुट्टी असते. मी संध्याकाळी येईन. तेव्हा मॅनेजरने उत्तर दिले - आम्हाला सकाळच्या शिफ्टसाठी कोणीतरी हवे आहे. अशी कोणती योजना आहे जी तुम्ही रद्द करू शकत नाही?
त्यावर कर्मचारी म्हणतो, मला माझ्या मित्राला शिफ्टिंगमध्ये मदत करायची आहे. त्यापेक्षाही मोठी कामे आहेत मला, त्यामुळे मी ऑफिसला येऊ शकत नाही. तुम्ही मला अचानक रात्री 10 वाजता मला मेसेज करुन उद्या कामाला यायला सांगत आहात, हे चुकीचे आहे. मी एक मेहनती आणि प्रामाणिक कर्मचारी आहे, त्यामुळे मीही थोड्याफार सन्मानाची अपेक्षा करतो.
कर्मचारी नोकरी सोडतोबॉस म्हणतो, तुझा मित्र दुसऱ्या कुणाची मदत घेऊ शकत नाही का? यापुढचा मेसेज काळजीपूर्वक कर. यावर कर्मचारी त्याला सडेतोड उत्तर देतो आणि म्हणतो, माफ करा, मी यापुढे तुमच्यासाठी काम करू शकत नाही. तुम्ही अशापद्धतीने बोलत आहात, हे अत्यंत चुकीचे आहे. तुम्ही मला 4 वर्षांपासून ओळखता आणि आता असं बोलत आहात. हेच माझी नोटीस पिरिय समजा, आता थेट सोमवारी भेटू... या व्यक्तीच्या पोस्टवर कमेंट्सटा पाऊस पडला आहे. अनेकजण याच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.