कोणत्याही कंपनीसाठी त्यांचे कर्मचारी ही खूप मोठी संपत्ती असते. कंपनी आणि बॉस नेहमीच कर्मचार्यांना आनंदी ठेवण्यासाठी नियोजन करत असतात. कधी वैद्यकीय सेवेचे फायदे, सहली किंवा विविध पॉलिसीज राबवून कर्मचार्यांना खूश करतात. कधी-कधी व्हेकेशनसाठी वेगळी सुट्टी मंजूर करतात. असंच काहीस आता घडलं आहे. एका बॉसने आपल्या कर्मचार्यांना एक्स्ट्रा सुट्टी देऊन खूश केलं आहे.
अवर कम्युनिटी (Our Community) नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या बॉसने म्हणजेच डेनिस मोरियरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. डेनिस यांनी कर्मचार्यांना कामासाठी आठवड्याचे चारच दिवस ऑफिसमध्ये यायला सांगितलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्तीची सुट्टी देताना पगार कापणार नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. कर्मचारी आपल्या बॉसच्या निर्णयाने खूप आनंदी आहेत.
कंपनीत आठवड्याचे चार दिवस काम करण्याचं धोरण
डेनिस मोरियरी यांनी आपल्या कंपनीत आठवड्याचे चार दिवस काम करण्याचं धोरण राबवायला सुरुवात केली आहे. या पॉलिसीचा त्यांना खूपच फायदा झाल्याचं समजतं. डेली स्टारच्या वृत्तानुसार डेनिस असं म्हणतात, की या पॉलिसीचं त्यांच्या कर्मचार्यांनी स्वागत केलं. ऑगस्ट महिन्यापासून या धोरणानुसार प्रायोगिक तत्त्वावर काम सुरू आहे. कर्मचार्यांचं मन राखण्यासाठी त्यांनी ही ट्रायल पॉलिसी कायमची लागू करण्याचं ठरवलं आहे.
"कामाचे तास 20 टक्क्यांनी कमी होताहेत पण पगार पूर्ण मिळणार"
स्कीमविषयी बोलताना डेनिस म्हणाले की, ही स्कीम ऑफिससाठी उपयुक्त आहेच; पण कर्मचार्यांसाठीही उत्तम आहे. यामुळे कर्मचार्यांना अपेक्षित स्वातंत्र्य मिळेल. तसंच उरलेले 3 दिवस ते एखादा छंद, आवड जोपासतील. आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवतील. सध्या ही 6 महिन्यांची ट्रायल पॉलिसी आहे पण ही पॉलिसी पुढेही सुरू राहील. या नव्या धोरणामुळे कंपनीकडून कर्मचार्यांच्या कामाचे तास 20 टक्क्यांनी कमी होताहेत पण पगार मात्र पूर्ण मिळणार आहे. फक्त आठवड्यातल्या या 4 दिवसांचे कामाचे तास वाढवण्यावर भर दिला जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"