Eye Care : प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की, त्यांच्या लहान मुले नेहमी निरोगी आणि फीट रहावी. मुलं मोठी होईपर्यंत त्यांना हाताच्या फोडाप्रमाणे जपतात. मात्र, लहान मुलांच्या अशाही काही मागण्या असतात ज्या इच्छा नसूनही पालकांना मान्य कराव्या लागतात. त्यानंतर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. अशीच एक धक्कादायक घटना अमेरिकेतून समोर आली आहे.
ऑडिटी सेंट्रलच्या रिपोर्टनुसार, इथे एका १२ वर्षाच्या मुलाला आता डोळ्यांनी काहीच दिसत नाही. डॉक्टारांनी यामागचं कारण शोधलं, जे सगळ्या पालकांना माहीत असायला हवं. कारण त्याला न दिसण्याचं कारण खाण्या-पिण्याशी संबंधित आहे. आतापर्यंत जंक फूड किंवा फास्ट फूड खाऊन लठ्ठपणा वाढतो असाच समज होता. मात्र, आता समोर आलं आहे की, या पदार्थांच्या सेवनाने डोळ्यांची दृष्टीही जाऊ शकते.
बर्गर-फ्राइज, ज्यूसने गेले डोळे
रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्समध्ये राहणाऱ्या एका १२ वर्षीय मुलासोबत जे झालं ते डोळ्यात अंजन घालणारं आहे. या मुलाच्या केसचा रिपोर्ट The New England Journal of Medicine कडून प्रकाशित करण्यात आला आहे. मुलगा ऑटिस्टिक (ऑटिझम हा बालपणात मज्जातंतूंच्या विकासाशी (न्युरो डेव्हलपमेंट) संबंधित विकार आहे. या मुलांची मानसिक क्षमता विकसित होत नाही.) असून त्याला काही पदार्थ खाल्ल्यावर समस्या होत होत्या. अशात तो केवळ बर्गर, फ्राइज, रॅंच ड्रेसिंग, डोनट्स आणि शुगर असलेल्या ज्यूसचं सेवन करत होता. आई-वडिलांनी त्याला भाज्या खाऊ घालण्याचा प्रयत्न केला, पण त्याने खाल्ल्या नाहीत. आधी सगळं काही ठीक सुरू होतं. पण एक दिवस अचानक सकाळी आणि सायंकाळी त्याला दिसण्यास समस्या होऊ लागली होती.
जंक फूडमुळे झाला दृष्टीहीन
ही समस्या आई-वडिलांना समजेपर्यंत बराच उशीर झाला होता. त्यांनीही दुर्लक्ष केलं. अचानक एका रात्री मुलगा उठला आणि म्हणाला की, त्याला काहीच दिसत नाहीये. डॉक्टरांकडे गेल्यावर समजलं की, मुलाच्या शरीरात पोषण कमी असल्याने त्याची ऑप्टिक नर्व्स कमजोर झाल्या आहेत. डॉक्टरांनी औषधं आणि पोषक आहार देऊन त्याला ठीक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा काही फायदा झाला नाही. व्हिटॅमिन्स, सप्लीमेंट्स आणि हिरव्या पालेभाज्या खाऊ घालूनही मुलाच्या डोळ्यांची दृष्टी परत आली नाही. Boston Children’s Hospital च्या डॉक्टरांनी सांगितलं की, रिस्ट्रिक्टिव फूड इनटेक डिसऑर्डरमुळे मुलगा हेल्दी आहार घेऊ शकत नव्हता.