शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
2
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
3
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
4
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
5
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
6
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
7
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
9
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
10
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत
11
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
12
VIDEO: इम्तियाज जलील यांची घोषणा; विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार
13
IND vs NZ : भारताची लाजिरवाणी कामगिरी; रोहितकडून मोठ्या चुकीची प्रामाणिक कबुली, म्हणाला...
14
'मिट्टी में मिला देंगे...', 'योगी'राजमध्ये आतापर्यंत किती गुन्हेगारांचा एन्काउंटर? पाहा आकडेवारी
15
"हे कुठून आले?"; किरीट सोमय्यांचं आकडेवारी बोट, व्होट जिहादबद्दल काय बोलले?
16
"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले
17
मविआत २६० जागांचा तिढा सुटला, २८ जागांवर प्रचंड रस्सीखेच; आजच जागावाटप फायनल होणार?
18
"लाडक्या बहिणींना मदत करताना जाहिरातबाजी आणि चमकोगिरीची गरज काय?", काँग्रेसचा सवाल
19
भारतात लवकरच Flying Taxi सर्व्हिस सुरू होणार, जाणून घ्या किती असेल भाडे?
20
"रोहितसाठी 'ही' चिंतेची बाब; कोहलीने 'हा' मोह टाळावा"; मुंबईकर माजी क्रिकेटपटूचं रोखठोक मत 

गर्लफ्रेंडच्या घरात घुसून राडा घातला; कोर्टाची शिक्षा ऐकून बॉयफ्रेंड नाचू लागला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 8:36 AM

झोपलेल्या गर्लफ्रेंडचे केस कापणारा आणि तिच्या घरात तोडफोड करणाऱ्या बॉयफ्रेंडचे नाव ओवेन जेम्स टाइसो आहे.

एक व्यक्ती बळजबरीनं त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरात घुसला, त्याने झोपलेल्या गर्लफ्रेंडचे केस कापले. इतकेच नाही तर घरात तोडफोड केली. कार, टीव्ही, खिडक्या फोडल्या. गर्लफ्रेंडने विश्वासघात केल्यामुळे संतापलेल्या बॉयफ्रेंडने हे कृत्य केले. त्यानंतर गर्लफ्रेंडच्या तक्रारीवरून पोलिसांनी बॉयफ्रेंडला अटक केली. त्यानंतर या प्रकरणात कोर्टाने सुनावणी घेत निर्णय दिला आहे. मात्र हा निर्णय ऐकून बॉयफ्रेंड कोर्टाच्या बाहेर गर्लफ्रेंडसमोरच नाचू लागला. 

ब्रिटनच्या नॉर्थम्प्टन येथील हा प्रकार आहे. माहितीनुसार, झोपलेल्या गर्लफ्रेंडचे केस कापणारा आणि तिच्या घरात तोडफोड करणाऱ्या बॉयफ्रेंडचे नाव ओवेन जेम्स टाइसो आहे. गर्लफ्रेंडने माझा विश्वासघात केला त्यामुळे रागाच्या भरात मी हे कृत्य केले अशी कबुली जेम्सने कोर्टात दिली. त्याचसोबत मी शारिरीकरित्या मुलीला कुठलीही हानी पोहचवली नाही. आम्ही ३ वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो असेही त्याने कोर्टाला सांगितले. 

या प्रकरणाच्या सुनावणीनंतर नॉर्थम्प्टन क्राऊन कोर्टाच्या जजने जेम्सला जेलमध्ये पाठवले नाही. त्याला सुधारण्यासाठी कोर्टाने संधी दिली. न्यायाधीशांनी हा निकाल दिला. मात्र शिक्षेतंर्गत जेम्सला जेलमध्ये जावे लागले नसले तरी कोर्टाने त्याच्यावर १२ महिने प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे. त्याला रिहैब सेंटरलाही पाठवले आहे. 

मुलीला द्यावे लागणार २५ हजार नुकसान भरपाईकोर्टाने जेम्सला आदेशही दिले की, नुकसान भरपाई म्हणून मुलीला २५ हजार रुपये आणि कोर्टाचा खर्च जेम्ला द्यावा लागेल. न्यायालयाने ही शिक्षा सुनावल्यानंतर जेम्सला काहीही पश्चाताप झाला नाही. त्याने कोर्टाच्या बाहेर येत गर्लफ्रेंडसमोर डान्स केला. सोशल मीडियात या घटनेचे फोटो व्हायरल होत आहेत. या प्रकारानंतर जेम्सची नोकरी गेली, त्याला पोलीस कस्टडीत राहावे लागले. तो सराईत गुन्हेगार नाही. त्यादिवशी जो प्रकार घडला तो रागाच्या भरात घडला असा युक्तिवाद जेम्सच्या वकिलांनी कोर्टात मांडला होता.