एका 65 वर्षीय करोडपतीने 16 वर्षांच्या शाळेत जाणाऱ्या मुलीशी लग्न केलं आहे. या लग्नाबद्दल लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून ब्राझीलचे महापौर हिसाम हुसैन देहॅनी आहे. विरोधामुळे त्यांनी पद सोडलं आहे. 15 एप्रिल रोजी ज्या मुलीशी लग्न केलं ती चाइल्ड ब्युटी क्वीन कौएने रोडे कॅमार्गो आहे. लग्नाच्या चार दिवस आधी ती 16 वर्षांची झाली आहे.
याहू न्यूजच्या रिपोर्टनुसार, देहॅनी 14 मिलियन ब्राझिलियन रिअलच्या मालमत्तेचा मालक असल्याचा दावा केला जात आहे. लग्न केल्यानंतर त्यांना सिददानिया राजकीय पक्षाचा राजीनामा द्यावा लागला. आणखी एक गोष्ट समोर आली की देहॅनी यांनी लग्नाआधी आपल्या वधूच्या दोन नातेवाईकांना टॉप नोकऱ्या दिल्या होत्या. यामध्ये मुलीची आई आणि काकीचा समावेश आहे.
मेलऑनलाइनच्या अहवालानुसार, वधूच्या 36 वर्षीय आईला संस्कृती आणि पर्यटनासाठी नवीन शहर सचिव झाल्यानंतर पगारात $1500 वाढ मिळाली. यासोबतच त्यांच्या काकीची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, महापौरांनी आपल्या पदाचा गैरवापर करून त्यांना काम मिळवून दिल्याचे निदर्शनास आल्याने दोघांनाही पदावरून हटवण्यात आले.
देहॅने सहा वेळा लग्न केले आहे. त्यांचे पहिले लग्न 1980 मध्ये झाले होते. तो 16 मुलांचा बाप आहे. 2000 साली ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणात अटकही झाली होती. याच दरम्यान 100 दिवसांपेक्षा जास्त काळ कोठडीत होते. नंतर या प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला.
ब्राझीलमध्ये मुलींनी वयाच्या 16 व्या वर्षी लग्न करणे हा गुन्हा नाही. यासाठी पालकांची परवानगी घेणे आवश्यक आहे. देहॅन यांची नवीन बायको अजूनही शाळेत जाते. आपल्या लग्नाचा दिवस हा सर्वात आनंदाचा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लग्नासाठी चांगली तयारी झाली होती. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे प्रेम. खूप खूप धन्यवाद असं लिहिलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"