उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये एका नवरदेवासोबत गंमत करणं महागात पडलं. नवरीच्या मैत्रिणीनी आपल्या होणाऱ्या भाओजीसोबत छोटीशी गंमत केली. यावर तो इतका भडकला की, लग्नास नकार दिला.
शिकोहाबादच्या एका भागात राहणाऱ्या तरूणाचं लग्न नगला झाल इथे राहणाऱ्या तरूणीसोबत ठरलं होतं. ठरलेल्या वेळेनुसार वरात मंगळवारी सायंकाळी नगला झाल इथे पोहोचली. यादरम्यान नवरीच्या शेजारी राहणाऱ्या एका तरूणाचा आजारामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आजूबाजूला शोककळा पसरली होती. अशात दोन्हीकडील परिवारांनी वरातीत बॅंड न वाजवण्याचा निर्णय घेतला.
नवरदेव विना बॅंड बाजा नवरीच्या घरी पोहोचला आणि मग हार घालण्याचा रिवाजही झाला. जेव्हा नवरी आणि नवरदेव सोबत जेवण करत होते तेव्हा नवरीच्या मैत्रिणीनी नवरदेवासोबत गंमत केली. ज्यावर नवरदेव भडकला. नवरदेव म्हणाला की, बॅंडशिवाय लग्न होत आहे तर मग त्याच्यासोबत गंमत का केली जात आहे. यावरून वाद पेटला आणि कन्यादान रिवाजाच्या आधी नवरीने लग्न करण्यास नकार दिला.
गावातील लोकांनी पंचायत बोलवून नवरीला लग्न करण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला. पण नवरी असं म्हणाली की, ती विष खाऊन जीव देईल. पण या मुलासोबत लग्न करणार नाही. यानंतर लग्न करताच नवरीचा वरात परत गेली. सध्या नवरीसाठी दुसऱ्या मुलाचा शोध घेतला जात आहे. असंही समजतं की, दोन्ही पक्षात आपसी सहमती झाली आहे.