शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

डोकं फिरलया या बयेचं! नवरीबाई म्हणे, लग्नात जितकं महागडं गिफ्ट त्यानुसार प्रत्येकाला जेवण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 9:08 PM

अगदी लग्नपत्रिकेपासून ते कपडे, दागिने, ठिकाण, सजावट, भोजन अशा अनेक गोष्टींमध्ये नावीन्य आणण्यावर भर दिला जातो. अमेरिकेतील अशाच एका कपलच्या लग्नाची आमंत्रणपत्रिका (Wedding Invitation) सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

लग्न (Wedding) हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा क्षण असतो. हा सोहळा सर्वांसाठी अविस्मरणीय बनवण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या कल्पना लढवत असतात. अगदी लग्नपत्रिकेपासून ते कपडे, दागिने, ठिकाण, सजावट, भोजन अशा अनेक गोष्टींमध्ये नावीन्य आणण्यावर भर दिला जातो. अमेरिकेतील अशाच एका कपलच्या लग्नाची आमंत्रणपत्रिका (Wedding Invitation) सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

लग्नपत्रिकांमध्ये नवरा-नवरीचं नाव, लग्नाचं स्थळ, लग्नाच्या कार्यक्रमांची वेळ दिलेली असतं. पण या लग्नपत्रिकेत यासोबतच लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी अशी अट ठेवण्यात आली आहे, की सर्वांनाच धक्का बसला आहे.

सामान्यपणे तुम्ही पाहिलं असेल की लग्नाच्या पत्रिकेत अगदी शेवटी काही लोक आहेराचाही उल्लेख करताना दिसतात. आहेर किंवा भांडी आणू नयेत, असा आशय आपण पाहतो. पण या लग्नपत्रिकेत गिफ्टबाबत असं काही नमूद केलं आहे, हे तुम्हीही हैराण व्हाल. लग्नात जो जसं गिफ्ट देईल, त्याला तसंच जेवण मिळेल, अशी अट या पत्रिकेत आहे. म्हणजे जो जितकं महागडं गिफ्ट देईल तितकं त्याला चांगला जेवण खायला मिळेल.

गिफ्टनुसार पाहुण्यांच्या कॅटेगिरी आणि त्यांच्यासाठी जेवणाचा वेगवेगळा मेन्यूही तयार करण्यात आल्या. ‘लव्हिंग गिफ्ट’ (Loving Gift) या पहिल्या श्रेणीत 250 डॉलर्स म्हणजेच सुमारे 18 हजार रुपये किमतीची भेट देणाऱ्या पाहुण्यांना चिकन किंवा मासे यांचा समावेश असलेलं भोजन दिलं जाईल. ‘सिल्व्हर गिफ्ट’ (Silver Gift) श्रेणीत 36 हजार रुपयांची भेट देणाऱ्या लोकांना रोस्टेड चिकन किंवा सालमन मासे, तसंच स्टेक यांचा समावेश असलेलं भोजन दिलं जाईल. ‘गोल्डन गिफ्ट’ (Golden Gift) श्रेणीत 73 हजार रुपये किंमतीच्या भेटवस्तूंच्या बदल्यात लॉब्स्टर टेल्स आणि फिले मिग्नॉन्स यांचा समावेश असलेलं भोजन दिलं जाईल. ‘प्लॅटिनम भेटवस्तू’ (Platinum Gift) या श्रेणीतल्या लोकांना सुमारे अडीच लाख रुपयांची भेट आणावी लागेल. या लोकांना वरील तीन श्रेणींमध्ये दिल्या जाणाऱ्या पदार्थांसह शॅम्पेन आणि लॉबस्टर यांचा समावेश असलेलं भोजन दिलं जाईल.

सोशल मीडियावर लग्नाची ही पत्रिका व्हायरल होत आहे. त्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने तर नवरीबाईचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, असंही म्हटलं आहे. तर एका युझरने आपलं गिफ्ट महाग आहे, असं सांगून भरपेट खाण्याचा आनंद लुटावा असा सल्ला दिला आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके