एका तरूणीचं तिच्या लग्नाच्या दिवशीच निधन झालं. गुजरातच्या भावनगरच्या सुभाष नगर भागात लग्न सुरू असताना एका नव्या नवरीला हार्ट अटॅक आला आणि तिचा मृत्यू झाला. त्यानंतर जे झालं ते वाचून तुम्ही हैराण व्हाल. ही घटना भावनगरच्या भगवानेश्वर महादेव मंदिरासमोर झाली. नारी गावातील राणाभाई बूटाभाई अलगोटार यांचा मुलगा विशालचं लग्न जिनाभाई राठौर यांची मुलगी हेतलसोबत होणार होतं. हेतल कथितपणे तिच्या लग्नाच्या रिवाजांदरम्यान बेशुद्ध झाली होती. तिला लगेच जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. जिथे डॉक्टरांनी सांगितलं की, तिला हार्ट अटॅक येऊन तिचं निधन झालं.
जेव्हा कुटुंबिय हेतलसोबत जे झालं त्याने दु:खात होता, तेव्हा नातेवाईकांनी एक वेगळा विचार मांडला की, लग्न सुरूच राहू द्या. नातेवाईकांनी सल्ला दिला की, नवरीच्या लहान बहिणीचं विशालसोबत लग्न लावून द्या.
नवरीचं निधन झाल्यानंतर कुटुंबियांनी तिच्या बहिणीचं लग्न नवरदेवासोबत लावण्याचं आणि लग्न रितीरिवाजानुसार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टनुसार, लग्न समारंभ संपेपर्यंत हेतलचा मृतदेह कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला होता. भावनगर शहराचे खासदार आणि मालधारी समाजाचे मुख्य लक्ष्मणभाई राठौर यांनी ही घटना दु:खद असल्याचं सांगितलं.
त्यांनी दावा केला की, त्यांच्या मुलीच्या मृत्यूनंतर परिवाराला धक्का बसला असून सुद्धा समाजातील सदस्यांनी त्यांना समाजात एक उदाहरण स्थापन करण्यासाठी तयार केलं. पण या घटनेमुळे सोशल मीडियावर वाद पेटला आहे. अनेकांनी हे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
चिन्मयी श्रीपदा नावाच्या एका महिलेने ट्विटरवर लिहिलं की, "हार्ट अटॅकमुळे नवरीचं निधन झालं. नातेवाईकांनी कुटुंबियांना नवरदेवाला रिकाम्या हाताने न पाठवण्यासाठी तयार केलं. मृत मुलीच्या बहिणीचं लग्न नवरदेवासोबत लावलं. अशाप्रकारे डिस्पोजेबल आणि बदलता येणाऱ्या तरूणी भारतीय समाजात आहेत". लोक यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.