Bride Run Away with Boyfriend : उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये एक नवरी लग्नाच्या काही तासांनंतर आपल्या प्रियकरासोबत फरार झाली. लग्नाचे सगळे रिवाज पार पडले आणि नवरीची पाठवणी झाली. त्यानंतर तिने सगळ्यांनाच धक्का दिला.
आग्र्याच्या बमरौलीमधून बुधवारी सायकांळी एक वरात आली होती. लग्नाचे रिवाज गुरूवारी पूर्ण झाले आणि गुरूवारीच नवरदेव कारने आपल्या नवरीला घरी घेऊन जाण्यासाठी निघाला होता.
रस्त्यात सगळे आनंदाने जात होते. तेव्हाच नवरी म्हणाली की, तिला बरं वाटत नाहीये आणि तिने गाडी थांबवण्यास सांगितली. जशी कार थांबली नवरी ताजी हवा घेण्यासाठी उभी झाली.
तेव्हाच एक तरूणी बाईकवरून आला आणि नवरी त्याच्या बाईकवर बसून पसार झाली. दोघेही आग्र्याकडे निघाले होते. आपल्या नवरीला दुसऱ्या कुणासोबत जाताना पाहून नवरदेव ओरडला. ज्यानंतर तिथे असलेले लोक बाइकला पकडण्यासाठी धावले.
कारमध्ये असलेल्या नवरेदवाने बाईकचा पाठलाग केला. ज्यानंतर आपण अडकल्याचं पाहून प्रियकर प्रेयसीला रस्त्यावर सोडून फरार झाला. आता नवरी-नवरदेव आणि त्यांच्या परिवारातील लोक पोलिसांकडे गेले असून त्यांची समजूत काढण्यात येत आहे.