कोरोना व्हायरसची दहशत किती आणि कशी पसरली आहे याची अनेक उदाहरणे दाखवणाऱ्या घटना समोर येत आहेत. झारखंडमधून (jharkhand) अशीच एक घटना समोर आली आहे जी वाचून तुम्ही हैराण व्हाल. धनबादमधील (Dhanbad) एक नवरी तिच्या मधुचंद्राच्या रात्रीच सासर सोडून पळाली (Bride Escaped From Suhagrat). याची नवरदेवाला कानोकान खबरही लागली नाही. आता हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे.
मधुचंद्राच्या रात्री नवरी पसार
असे म्हणतात की, मधुचंद्राची रात्र ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात रात्र असते. पण जर एखाद्याची नवरी याच मधुचंद्राच्या रात्री पळून गेली तर काय होईल? धनबादच्या टुंडीमध्ये नवरी टॉयलेटला जाण्याचं कारण सांगत रूममधून बाहेर आली आणि फरार झाली. आणि नवरदेव नवरीची आतुरतेने वाट बघत राहिला. जेव्हा बराच वेळ होऊनही नवरी परसती नाही तर नवरदेवाला शंका आणि त्याने नवरीचा शोध सुरू केला. (हे पण वाचा : लग्नात नवरीनं नवऱ्याला घातलं मंगळसूत्र; मग पुढे घडलं असं काही......)
का पळाली नवरी?
दैनिक जागरणमध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार, नंतर नवरीच्या घरी फोन करण्यात आला तर समजलं की, ती माहेरी आली आहे. या संपूर्ण प्रकारात कोरोना व्हिलन ठरला आहे. कारण कोरोना व्हायरसच्या भीतीने नवरी मधुचंद्राच्या रात्री कुणाला न सांगता माहेरी पळून गेली.
काय झालं त्या रात्री?
३० एप्रिल रोजी धनबादच्या टुंडीजवळील बेगनोरिया गावात राहणाऱ्या तरूणाचं लग्न बरवाअड्डा पोलीस क्षेत्रातील एका गावातील तरूणीसोबत झालं होतं. दुसऱ्या दिवशी १ मे रोजी नवरी नवरदेवासोबत सासरी गेली. दिवसभर सगळंकाही ठीक होतं. रात्री साधारण ११ वाजता नवरदेव नवरीजवळ बेडरूममध्ये पोहोचला. यावेळी नवरदेव खोकत होता. त्यामुळे नवरी घाबरली. नवरीला वाटलं की नवरदेवाला कोरोना झालाय. जर ती तिथे थांबली तर तिलाही कोरोनाची लागण होईल.
त्यानंतर नवरीने टॉयलेटला जाण्याचं कारण केलं आणि बाहेर जाऊन तिने माहेरी भावाला फोन केला. तिने भावाला सगळा प्रकार सांगितला आणि भाऊही तिला घेण्यासाठी तिच्या सासरी पोहोचला. (हे पण वाचा : Video : लॉकडाऊनमध्ये ड्यूटी करणाऱ्या पोलिसांनी चिमुरडीच्या हातात दिला दांडा; मग पाहा काय झालं.....)
दरम्यान, नवरदेवाच्या घरातील अनेकांना ताप होता. परिवारातील लोकांनी कोरोनाची टेस्टही केली होती. अशात सासरच्या कुणीतरी नवरीला गंमतीत म्हणालं की, जर आम्ही लोक कोरोना संक्रमित निघालो तर जवळच्या कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन व्हावं लागेल. त्यामुळे नवरी घाबरली होती. आता असं समजतं की, एखादा शुभ मुहूर्त पाहून नवरीची पुन्हा पाठवणी केली जाईल.