(Image Creadit : Insider)
स्वतःच्या लग्नाबाबत प्रत्येक जण स्वप्न रंगवत असतं. पण त्यासोबतच लग्नसमारंभामध्ये सहभागी होणारी इतर मंडळीही स्वप्न पाहत असतात. त्यामध्ये प्रत्येकाच्या वेगवेगळ्या डिमांडही ऐकायला मिळतात. सध्या इंटरनेटवर एका नवरीची डिमांड लिस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये नवरीने तिच्यासाठी नाही तर तिच्याकडून येणाऱ्या पाहुण्यांसाठी काही अटी ठेवल्या आहेत. तिची ही लिस्ट इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
अशी डिमांड लिस्ट तुम्ही पाहिलीच नसेल
काही दिवसांपूर्वी अमेरिका सोशल न्यूज आणि डिस्कशन फोरम 'रेडिट'वर एका ईमेलचा स्क्रिनशॉट शेअर केला होता. Laika_cat नावाच्या यूजरने हा स्क्रिनशॉर्ट पोस्ट केला होता. त्यांनी सांगितले की, त्यांना एका लग्नसमारंभामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण देण्यात आले होते. त्याचसोबत लग्नाचे आयोजन करणाऱ्या लोकांकडून एक डिमांड लिस्टही पाठवण्यात आली होती. या लिस्टमध्ये विचित्र डिमांड करण्यात आल्या होत्या.
लग्नासमारंभात सहभागी होण्यासाठी या अटी मान्य कराव्या लागतील
ईमेलचा स्क्रीनशॉट पोस्ट करत Laika_cat ने असं लिहिलं की, '75 डॉलर किंवा त्यापेक्षा अधिक किमतीच्या गिफ्टशिवाय लग्नामध्ये तुम्हाला एन्ट्री मिळणार नाही.' यांसारख्या अनेक अटी लग्नामध्ये सहभागी होण्यासाठी ठेवण्यात आल्या. या अटी खालीलप्रमाणे -
- समारंभामध्ये 15 ते 30 मिनिटांआधी पोहचा
- कृपया पांढऱ्या, क्रिम रंगाचे किंवा हत्तीच्या दातांपासून तयार करण्यात आलेल्या कोणत्याही वस्तू परिधान करू नका.
- कृपया बेसिक बॉब किंवा पोनी टेल याव्यतिरिक्त कोणतीही हेअर स्टाइल करू नका.
- कृपया पूर्ण चेहऱ्यावर मेकअप करू नका.
- समारंभ सुरू असताना रेकॉर्डिंग करू नका.
- जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत फेसबुकवर चेक-इन करू नका.
- नवरीसोबत बोलण्याचा प्रयत्न करू नका.
- लग्नात येताना 75 डॉलर(5389 रूपये) किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीचे गिफ्ट घेऊन या. नाहीतर तुम्हाला लग्नामध्ये एन्ट्री नाही मिळणार.
ईमेलमध्ये स्पेलिंग मिस्टेकवरून नवरी झाली ट्रोल
रेडिटवर नवरीच्या अटी फार व्हायरल होत आहेत. अनेक कमेंट आल्या आहेत. लोक नवरीची थट्टाही करत आहेत. आश्चर्य करणारी गोष्ट म्हणजे ईमेलमध्ये अनेक चुका आहेत. एका यूजरने नवरीला ट्रोल करत असं लिहिलं आहे की, 'असं वाटतयं की, हा ईमेल नवरीने स्वतः लिहिला आहे.'