शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

इथे बहीण बनते 'नवरदेव', वहिनीसोबत करते लग्न; नवरदेव असतो घरी...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 11:40 AM

Weird Marriage Tradition : गुजरातच्या काही गावांमध्ये नवरदेवाशिवायच लग्न होतं. म्हणजे लग्नावेळी नवरदेव उपस्थित नसतो.

Weird Marriage Tradition : भारत हा देश आपल्या वेगवेगळ्या परंपरा आणि संस्कृतींसाठी ओळखला जातो. इथे वेगवेगळ्या भागात वेगवेगळे रिवाज आणि मान्यता बघायला मिळतात. लग्नाबाबत तर अनेक अनोख्या परंपरा फार आधीपासून चालत आल्या आहेत. लग्नाच्या एका अशाच अनोख्या रिवाजाबाबत आम्ही आज सांगणार आहोत. गुजरातच्या काही गावांमध्ये नवरदेवाशिवायच लग्न होतं. म्हणजे लग्नावेळी नवरदेव उपस्थित नसतो. त्याऐवजी नवरदेवाची बहीण वहिनीसोबत लग्न करते आणि आपल्या भावासाठी पत्नी आणते.

एका वेबसाइटनुसार, गुजरातच्या सुरखेड़ा, सनादा आणि अंबाल गावांतील आदिवासी जमातीमध्ये लग्नासंबंधी अनोखी परंपरा पाळली जाते. या गावातील लग्नांमध्ये नवरदेव उपस्थित असण्याची गरज नसते. त्याऐवजी नवरदेवाची अविवाहित बहीण किंवा परिवारातील कुणीही अविवाहित महिला हे लग्न करू शकते.

मान्यतेचं कारण

अर्थातच तुम्हाला या मान्यतेचं कारण काय? असा प्रश्न पडला असेल. असं म्हणतात की, या तिन्ही गावाचे जे कुलदेवता होते ते अविवाहित होते. त्यांना सन्मान देण्यासाठी लग्नावेळी नवरदेवाला त्याच्या घरीच ठेवलं जातं. जेणेकरून कुलदेवताचा श्राप नवरदेवाला लागू नये. नवरदेव लग्नाचे कपडे घालून तयार होतो. फेटा बांधतो आणि पारंपारिक तलवारही घेतो, पण तो त्याच्या लग्नात जात नाही.सगळे रितीरिवाज पार पाडते बहीण

एनडीटीव्हीच्या एका रिपोर्टनुसार, गावातील एका व्यक्तीने याबाबत सांगितलं की, नवरदेव आपल्या आईसोबत घरीच राहतो आणि नवरदेवाची बहीण वरात घेऊन जाते. लग्न करून बहीण नवरीला घरी आणते. जे रितीरिवाज नवरदेवाला पार पाडायचे असतात ते सगळे लग्नातील रितीरिवाज त्याची बहीण पार पाडते. मग ते सप्तपदी असो वा मंगळसूत्र घालून देणं असो.  

गावात मानलं जातं की, जर कुणी या परंपरेचं पालन केलं नाही तर त्यांच्यासोबत काहीतरी वाईट होईल. लोकांची मान्यता आहे की, एकदा ही परंपरा पाळली गेली नव्हती तेव्हा त्यांचं लग्न लवकरच मोडलं होतं. काही लोकांच्या जीवनात वेगवेगळ्या समस्या आल्या होत्या. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स