5 paisa power: आजच्या जमान्यात रुपया छोटा झाला आहे. 2000 रुपयांची नोट पाहणाऱ्यांकडे पाच पैशांचे नाणे कुठे असेल, तुमच्याकडेही नसेल. असलेच तर तुमच्या आजी, पणजीकडे जपून ठेवलेले. हा विचार करणाऱ्या एका हॉटेल मालकाला (Biryani hotel owner) एक आयडिया सुचली, पण ती एवढी अंगलट आली की त्याचा चांगलाच दम निघाला. आता पुन्हा तो अशा आयडिया सोडा, ऑफरही देण्याचा विचार करणार नाही. चला जाणून घेऊया नेमके काय झाले... (Biryani hotel owner announced offer of 5 paisa coin biryani, people came in hundreds)
तामिळनाडूच्या चेन्नईतील हा प्रकार आहे. एका नागरिकाने सुकन्या बिर्याणी हॉटेल सुरु केला. त्याने या हॉटेलच्या जाहिरातीसाठी एक भन्नाट ऑफर दिली. आयडिया अशी की, जो कोणीही ५ पैशांचे नाणे घेऊन येईल त्याला बिर्याणी दिली जाईल. तेव्हा त्याला याचा अंदाज नव्हता, की या ऑफरमुळे मोठा गोंधळ उडेल.
चेन्नईच्या सेल्लू भागात हे बिर्याणी हॉटेल आहे. पाच पैशांत बिर्याणी मिळणार हे ऐकून घरात मिळेल तिथून, आजुबाजुच्यांकडून मागून ५ पैशांची नाणी घेऊन एवढी गर्दी गोळा झाली की रांग काही कमी होईना. एक वेळ अशी आली 300 लोक उभे होते. रांग काही थांबत नव्हती. गोंधळ सुरु होता. अखेर हॉटेल मालकाने हॉटेलचे शटर खाली केले.
5 पैशांत बिर्याणी म्हणजे मोफतच की. यामुळे लोक कोरोनाही विसरले. ना मास्क, ना सोशल डिस्टन्स पाळला होता. फक्त हातात 5 पैशांचे नाणे होते. बिर्याणी संपल्यावर आणि झुंबड उडाल्यावर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी या गर्दीला शिस्त लावली. काहीनी ५ पैशांचे नाणे देऊनही बिर्याणी न मिळाल्याची तक्रार बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांकडे केली.