एक गाय किती महागडी असू शकते? फार फार तर कुणी सांगेल १ लाख रूपये. मात्र, सध्या एका गायीची किंमत चर्चेचा विषय ठरत आहे. नुकतीच एक गाय तब्बल २.६१ कोटी रूपयांना विकली गेली आहे. इतकी किंमत मिळाल्यावर या गायीने सर्व यूरोपियन रेकॉर्ड तोडले आहेत. म्हणजे यूरोप आणि ब्रिटनमध्ये ही गाय आतापर्यंत सर्वात जास्त किंमत मिळालेली गाय ठरली आहे.
इंडिया टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, २०१४ मध्ये या प्रजातीची एक गाय १३१,२५० पाउंडला विकली गेली होती. पण आता या प्रजातीच्या गायीला दुप्पट किंमत मिळाली आहे. ही गाय पॉश स्पाइस प्रजातीची गाय आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे Shroshire मध्ये जन्माला आलेल्या या गायीचं वय केवळ ४ महिने इतकं आहे. या गायीचा लिलाव २६२,००० पाउंडला करण्यात आला. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम २.६१ कोटी रूपये इतकी होते. क्रिस्टीन विलियम्स नावाच्या व्यक्तीची ही गाय होती. त्याला इतकी किंमत मिळाल्याने तो फार आनंदी आहे. तो म्हणाला की, जेवढी या गायीला किंमत मिळाली तेवढी रक्कम तो आयुष्यभरात कमाऊ शकला नसता.
का मिळाली इतकी किंमत?
या गायीने किंमतीचे जगातले सर्वात रेकॉर्ड तोडले. त्यामुळे अर्थातच लोकांना या गायीला इतकी किंमत का मिळाली हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल. तर ही गाय एक ब्रिडींग केलेली खास प्रकारची गाय आहे. इतर गायींपेक्षा या गायीचा शेप वेगळा आहे. तसेच या गायीचं मांसही लोक आवडीने खातात. जे चांगलंच महाग असतं. त्यामुळेच या गायीला इतकी किंमत मिळाली असे सांगितले जात आहे.