भाऊ बहिणीच्या प्रेमाला कोणत्याही पुराव्याची गरज नसते. बहिणीसाठी मोठा भाऊ वडिलांसारखा असतो, तो आई-वडिलांप्रमानेच लहान भावंडांवर प्रेम करतो, सांभाळ करतो आणि काळजी घेतो. पण कोवळ्या वयात, भावंडांच्या जिवासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालावा, अशा पद्धतीने जबाबदारी पार पाडल्याचे क्वचितच पाहायला मिळते. भाऊ-बहिणीच्या प्रेमाची अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यात भावाने मगरीच्या तोंडातून बहिणी वाचवले आहे.
बहिणीचा जीव वाचवण्यासाठी एका भावाने भयंकर मगरीशी झुंज दिली आणि तिला वाचववले. मगरीने मुलीचा पाय पाय जबड्यात धरला होता, पण भावाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बहिणीचा पाय मगरीच्या तोंडातून बाहेर काढला. डेली स्टारच्या वृत्तानुसार, मगरीने जबड्यात पकडलेली मुलगी केवळ 9 वर्षांची होती. रेजिमिया हायकेरा असे तिचे नाव असून, ती बागेत झाडांना पाणी देत असताना एक मगरी तिच्यावर हल्ला केला.
यानंतर मुलीने आरडाओरडा सुरू केला, बहिणीचा आवाज 19 वर्षीय भावाच्या कानावर पडताच तो धावत आला. बहिणीला अडचणीत असल्याचे पाहून 19 वर्षीय जोहान्सने आपल्या जीवाची पर्वा न करता भयंकर मगरीशी सामना केला. जोहान्स आपल्या बहिणीला वाचवण्यासाठी आला तेव्हा तिचा पाय मगरीच्या तोंडात होता. यावेळी जोहान्सने दोन्ही हातांनी खेचून बहिणीचा पाय त्या भयानक प्राण्याच्या तोंडातून बाहेर काढला.
या हल्ल्यातून रेजिमियाचा जीव वाचला, मात्र मगरीच्या हल्ल्यात तिच्या पायाला, कंबरेला आणि बरगड्यांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तिला दवाखान्यात न्यावे लागले. यावेळी जोहान्सही बहिणीला वाचवताना जखमी झाला. ही घटना समोर आल्यानंतर भाऊ जोहान्सच्या शौर्याने परिसरात कौतुक होत आहे. रेजिमिया हायकेराच्या घराजवळ एक नदी आहे जिथून अनेकदा प्राणी या परिसरात येतात, अशी माहिती आहे.