मेहुणी आणि भाओजींच्या जोडीची एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात चांगली धमाल असते. ही नातं थट्ट्याचं असतं. त्यामुळे त्यांच्या गमती-जमती सुरू असतात. पण आग्र्यामधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीला मेहुणीसोबत डान्स करणं चांगलंच महागात पडलं. एक कपल आपल्या एका नातेवाईकाच्या लग्नात गेलं होतं. इथे व्यक्तीची मेहुणी डीजेवर डान्स करत होती. तिने इशारा करत आपल्या भाओजींनाही डान्ससाठी बोलवलं. व्यक्ती तिला नकार देऊ शकला नाही आणि तो तिच्यासोबत डान्स करण्यासाठी गेला. पण हे बघून त्याची पत्नी अशी काही संतापली की, तिने सगळ्यांसमोर त्याला चपलेने मारलं.
एका लग्नामध्ये भाओजी आणि मेहुणी डान्स करत होते. तेव्हा पत्नीने दोघांना डान्स करताना पाहिलं. जे पाहून पत्नीला खूप राग आला. डान्स सुरू असतानाच पत्नी पतीची चपलेने धुलाई केली. त्यानंतर लग्नात शांतता पसरली. लोकांना समजलंच नाही की, नेमकं झालं काय? पत्नीने आपल्या पतीला चपलेने का मारलं?
आग्रा पोलीस लाईनमध्ये चालत असलेल्या कौटुंबिक समुपदेशन केंद्रात ही घटना आली. यानुसार मथुरा जिल्ह्यातील महिलेचं लग्न आग्रा येथील तरूणासोबत 2011 मध्ये झालं होतं. काही वर्षानी त्यांना एक मुलगा झाला. आनंदात संसार सुरू होता. एक दिवस हे कपल आपल्या नातेवाईकांच्या एका लग्नात गेलं. महिलेचा पती आपल्या मेहुणीसोबत डीजेवर डान्स करत होता. हे पत्नीला आवडलं नाही आणि तिथेच तिने पतीला चपलेने मारलं. पत्नीच्या या वागण्यामुळे पतीला धक्का बसला आणि तिथून निघून गेला.
कौटुंबिक समुपदेशन केंद्रात प्रकरण
कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पतीने काउन्सेलरने सांगितलं की, त्याला फार धक्का बसला आहे आणि तो पत्नीला सोबत ठेवण्यास तयार नाही. तेच पत्नी म्हणाली की, लग्नात तो माझ्या बहिणीसोबत डान्स करत होता. मी अनेकदा त्याना रोखलं. पण त्यांनी ऐकलं नाही. रागाच्या भरात मी त्याना चपलेने मारलं. कौटुंबिक समुपदेशन केंद्राचे काउन्सेलर सतीश खिरवार यांच्यानुसार, पतीला मेहुणीसोबत न बोलण्यास सांगण्यात आले. यावर तो तयार झाला आणि कपलमधील वादही मिटला.