पतीसोबत भांडण करून माहेरी गेली पत्नी, मग मेहुण्याने भाओजीला केलं किडनॅप आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 10:18 AM2024-01-05T10:18:16+5:302024-01-05T10:18:24+5:30

याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली असून मेहुण्यासहीत इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Brother in law kidnaps brother in law picture capture in cctv footage | पतीसोबत भांडण करून माहेरी गेली पत्नी, मग मेहुण्याने भाओजीला केलं किडनॅप आणि...

पतीसोबत भांडण करून माहेरी गेली पत्नी, मग मेहुण्याने भाओजीला केलं किडनॅप आणि...

Madhya Pradesh: मध्य प्रदेशच्या इंदुरमधून पती-पत्नीच्या वादाची एक घटना समोर आली आहे. पतीसोबत वाद झाल्यावर पत्नी आपल्या माहेरी निघून गेली. पण पती-पत्नीमध्ये घटस्फोट झाला नाही. तरीही महिलेचं दुसरं लग्न लावलं जात होतं. यावर जेव्हा पतीने आक्षेप घेतला तेव्हा त्याच्या मेहुण्याने त्याचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली असून मेहुण्यासहीत इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.

द्वारकापुरी इथे राहणाऱ्या नईम कुरैशीचं लग्न 2021 मध्ये झालं होतं. 2022 मध्ये नईमचा पत्नीसोबत काही कारणाने वाद झाला. यामुळे नईम कुरेशची पत्नी माहेरीच राहत होती. पतीला समजलं की, त्याच्या पत्नीचा दुसरा निकाह लावला जात आहे. ज्याबाबत पतीने पोलिसात तक्रार दाखल केली.

ही तक्रार मागे घेण्यासाठी नईम कुरैशीचं त्याच्या मेहुण्याने आपल्या चार साथीदारांसोबत मिळून अपहरण केलं. कारमध्ये बसवून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. पोलीस आता आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपी रिजवान आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत. 

Web Title: Brother in law kidnaps brother in law picture capture in cctv footage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.