(Image Credit : Meander Medical Centre/The Sun)
चार वर्षांपूर्वी म्हणजेच २०१५ मध्ये वैज्ञानिकांना चीनमध्ये एक १ हजार वर्ष जुनी मूर्ती सापडली होती. आधी तर वैज्ञानिकांना वाटलं होतं की, ही केवळ एक मूर्ती आहे. पण प्रत्यक्षात त्या मूर्तीत एक रहस्य दडलं होतं. जे समोर येताच वैज्ञानिकांना आश्चर्याचा धक्का बसला.
(Image Credit : Meander Medical Centre/The Sun)
वैज्ञानिकांनी नुकतंच या मूर्तीचं स्कॅनिंग केलं तेव्हा त्यांना मूर्तीच्या आत हाडं आढळून आलीत. त्यानंतर त्यांना जसजशा पुढे टेस्ट केल्या तसतसे नवनवीन रहस्यांवरून पडदा उठू लागला. १ हजार वर्ष जुन्या या मूर्तीच्या आता एका बौद्ध भिक्खुचा मृतदेह होता. हा मृतदेह ममी बनवून ठेवला होता. बौद्ध भिक्खु साधनेच्या अवस्थेत होते.
(Image Credit : Meander Medical Centre/The Sun)
शोधातून समोर आलं की, त्या बौद्ध भिक्खुचा मृत्यू 1100 AD च्या जवळपास झाला होता. द सनच्या रिपोर्टनुसार, या ममीला पाहून असं वाटत नाही की, बौद्ध भिक्खुने आत्म-ममीकरण केलं असावं म्हणजे स्वत: ममी झाले नसतील. असे मानले जात आहे की, काही लोकांनी त्यांच्या शरीरावर लेप लावला असेल, जेणेकरून मृत्यूनंतर त्यांचं शरीर सुरक्षित रहावं.
(Image Credit : Meander Medical Centre/The Sun)
वैज्ञानिकांकडून करण्यात आलेल्या अभ्यासातून समोर आलं की, या बौद्ध भिक्खुचा मृत्यू ३७ वर्ष वयात झाला असावा. असेही मानले जात आहे की, हे अवशेष झांग यांचे आहेत. त्यांना पॅट्रिआर्क झांगगोंग आणि लियुक्वान झांगगोंग या नावानेही ओळखले जात होते.