सिंह जंगलाचा राजा आहे, त्याच्या एका डरकाळीने परिसरात भयान शांतता पसरते. कुठलाही प्राणी सिंहासमोर यायला घाबरतो, कारण सिंहाच्या तावडीत सापडलेला प्राणी जिवंत वापस जाऊ शकत नाही. सिंहाने एकदा का त्याच्या जबड्यात भक्ष पकडले, की त्याचा जीव गेलाच म्हणून समजायचा. पण, सिंहाच्या जबड्यातून एक म्हैस सुरक्षित वाचल्याची घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होतोय.
म्हशीने वाचवला साथीदाराचा जीवसिंह स्वतःच्या वजनाच्या तीन ते चार पट वजनाच्या प्राण्याला सहज पाडू शकतो. पण, जंगल हे एक वेगळं जग आहे, इथे काहीही होऊ शकतं. जंगलात तुम्ही कधीही न पाहिलेले दृष्यही पाहू शकता. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सिंहाने जंगलात एका रानम्हशीवर हल्ला केला होता. ती म्हैस निपचीत पडली होती, तिला सिंहासमोर काहीच करता येत नव्हतं. तेवढ्यात दुसरी म्हैस तिथे आली आणि सिंहाला हाकलून लावलं
सिंहाला हवेत उडवलंदुसरी म्हैस येऊन फक्त सिंहाला पळवून लावत नाही, तर आपल्या शिंगाने त्या सिंहाला हवेत उडवते. शिंगांच्या मदतीने म्हैस सिंहावर एकदा नव्हे तर दोनदा हल्ला करते आणि त्याला पळवून लावते. सिंह जंगलाचा राजा आहे, पण या घटनेत तो म्हशसमोर अतिशय कमजोर दिसत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे कळू शकले नाही. पण, व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.