जगात कधी-कधी अशा काही घटना घडतात, ज्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. अशीच एक घटना अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेसोबत घडली आहे. १५ वर्षांपासून महिलेच्या पाठीत एक बंदुकीची गोळी अडकली होती (Woman Living with Bullet in Body) आणि ती आपलं सामान्य जीवन जगत होती. तिला या गोष्टीची कल्पनाही नव्हती. दीड दशकानंतर ही गोळी तिच्या शरीरातून काढली, मग तिला आठवलं की ही गोळी तिच्या शरीराच्या आत (Bullet Stuck in Body for 15 Years) कशी पोहोचली.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ही घटना एरिका माइल्स नावाच्या नर्सिंग असिस्टंटसोबत घडली. ही घटना तिने स्टक ऑन क्वेस्ट रेड या अमेरिकन सीरिजमध्ये शेअर केली. एरिका माईल्स किशोरवयीन असताना ही गोळी तिच्या पाठीत अडकली आणि ती अनेक वर्षे तिथेच अडकून राहिली. एरिकाला याची कल्पनाही नव्हती.
आपल्यासोबत घडलेली ही घटना आठवताना एरिकाने सांगितलं की, २००५ मध्ये फुटबॉल सामन्यानंतर ती आपल्या कारची वाट पाहत होती. दरम्यान, दोन गटात हाणामारी होऊन त्यांनी आपापसात गोळीबार सुरू केला. गोळीबारादरम्यान एरिकासह काही निष्पाप लोक इथे अडकले होते. त्याचवेळी एरिकाच्या पाठीत गोळी लागली आणि ती तिच्या हाडांमध्ये शिरली. त्यावेळी तिला फार काही जाणवलं नाही आणि मागील १५ वर्षांत तिला काही त्रासही झाला नाही. मात्र हळूहळू ही गोळी तिच्या कमरेच्या बाजूला सरकायला लागल्याने तिला त्रास होऊ लागला.
एरिकाची शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर जॉर्ज क्रॉफर्ड म्हणाले की, शरीरातून ताबडतोब गोळी बाहेर काढणं अवघड काम आहे. अशा परिस्थितीत अनेकवेळा गोळी कोणत्याही रक्तवाहिनीत किंवा सांध्यात अडकली नसेल तर ती शरीरातून काढलीच जात नाही. जर ती ताबडतोब काढली तर ती रुग्णाला हानी पोहोचवू शकते. एरिकाच्या बाबतीतही तेच होतं. तिच्या शरीरात गोळी आहे हेही ती विसरली होती. मात्र नंतर अचानक या गोळीने आपली जागा बदलण्यास सुरुवात केली. तेव्हा डॉक्टर जॉर्ज यांनी ती शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकली. आता एरिका बरी झाली आहे.