लंडन : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढताहेत. तसंच पेट्रोल आणि डिझेल ही संसाधनं नैसर्गिक असल्याने संपुष्टात येण्याची शक्यता आहे. म्हणून या संसाधनांचा जपून वापर केला पाहिजे अशी जनजागृतीही केली जाते. मात्र तरीही आपल्याकडून या संसाधनांचा अतिरिक्त वापर केला जातोय. पण लंडनमध्ये पेट्रोलच्या वाढत जाणाऱ्या किंमती आणि संसाधनांचा होणारा अतिरिक्त वापर रोखण्यासाठी एक हटके पद्धत शोधून काढली आहे. तिकडच्या बसेस सध्या कॉफीवर चालत आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. कॉफीपासून निघणाऱ्या तेलापासून या बसेस चालवल्या जात आहेत.
अाणखी वाचा - या कंपन्या भारतीय नसूनही आपल्या रोजच्या जीवनाचा भाग झाल्या आहेत
बीबीसी डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, लंडनमधील परिवहनाने हल्लीच हा उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे. कॉफीपासून निघणाऱ्या कचऱ्याच्या तेलाचा वापर इंधन म्हणून केला जात आहे. या तेलाला ब्लेंडिंग ऑईल असं म्हणतात. या ब्लेंडिंग ऑईलला डिझेलमध्ये टाकून बायोफ्यूअल बनवलं जातं. हेच बायोफ्यूअल लंडनच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी वापरलं जात आहे. हा उपक्रम जर लंडनमध्ये यशस्वी ठरला तर याचा फायदा जगभर होऊ शकतो.
आणखी वाचा - हे पुर्ण कुटूंब घेतंय लखपती भिकाऱ्याचा शोध
लंडन येथील बायो-बीन या कंपनीचं असं म्हणणं आहे की, या बायोफ्यूअलपासून एका गाडीसाठी पूर्ण पॉवर मिळते. त्यामुळे लंडनच्या परिवहनने या बायोफ्यूअलचा वापर वाढवला आहे. या कंपनीचं असंही म्हणणं आहे की कॉफी कारखान्यातून एका वर्षात कॉफीतून २ लाख टन कचरा तयार होतो. हा कचरा बायोफ्यूअल बनवणाऱ्या कंपन्या इथून उचलतात आणि त्यापासून बायोफ्यूअल तयार केला जातो. लंडनमधील जवळपास ९ हजार ५०० बसेस या बायोफ्यूअलचा वापर करत आहेत.
आणखी वाचा - ऐकावं ते नवलच! गर्लफ्रेण्डला इम्प्रेस करायला ते तिघे करायचे चोरी
बीन-बायो या कंपनीने सांगितल्याप्रमाणे २.५ मिलिअन कॉफीपासून तयार होणारा कचरा एका बससाठी संपूर्ण वर्षभर चालू शकतो. बायोफ्यूअलमुळे संपत जाणाऱ्या नैसर्गिक संसाधनांवरचा भार कमी होईल तसेच, या संसाधनांच्या किंमतीही वाढणार नाहीत. असाच उपक्रम जर जगभरातील सगळ्याच देशांनी राबवला तर येत्या काही वर्षात नैसर्गिक संसाधनांची होणारी हानी रोखता येईल.
सौजन्य - www.bbc.com
Get Latest Marathi News, Mumbai News, Pune News, Maharashtra News Here on Lokmat.com