Netherlands and Belgium Border : जगात असे अनेक देश आहेत जे आपल्या सुरक्षेसाठी आपल्या सीमांवर सैनिक तैनात करतात. बॉर्डर म्हणजे अशी लाईन जी दोन देशांना वेगळं करते. भारत आपल्या देशाची सीमा अनेक देशांसोबत शेअर करते. पण काही देशांच्या सीमा युद्धाचं घर आहेत. पाकिस्तानशिवाय चीनच्या सीमेवरही घुसखोर नेहमीच पकडले जातात.
तसा एक सामान्य समज आहे की, सीमेवर नेहमीच युद्ध चालतं. पण आज आम्ही तुम्हाला ज्या सीमेबाबत सांगणार आहोत तिथे असं काही होत नाही. ही सीमा जगातील सगळ्यात बिझी बॉर्डर म्हणून ओळखली जाते. दररोज लाखो लोक ही पार करतात. तरीही इथे कधीच युद्ध होत नाही. या सीमेवर एक कॅफे आहे जिथे दोन्ही देशातील लोक सोबत चहा पितात. याचं कारण आहे दोन देशांमधील शांती करार. आम्ही तुम्हाला सांगतोय नेदरलॅंड आणि बेल्जिअममधील सीमेबाबत.
या सीमेचा इतिहास रोमांचक आणि जुना आहे. या सीमेचं निर्माण 1843 मध्ये करण्यात आलं होतं. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये ट्रीटी ऑफ मास्ट्रिच्ट (Treaty of Maastricht) करार करण्यात आला होता. या कराराचा उद्देश दोन्ही देशांमध्ये शांतता कायम करणं हा होता. सोबतच भविष्यात कोणतंही युद्ध टाळण्याचा हेतू होता. गेल्या काही वर्षात या सीमेवर बरेच बदल बघायला मिळाले. या सीमेवरील शांतता बघून सगळेच हैराण होतात.