चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. जगात १ कोटी ९० लाखाहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर साडेसात लाखाहून जास्त लोकांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. जगभरात वाढणारं कोरोना संकट रोखण्यासाठी प्रत्येक देश आपापल्या पातळीवर प्रयत्न करत आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव कमी करण्यासाठी विविध योजना आणत आहेत. अशातच अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथे रुग्णाचा कोरोना व्हायरसचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याला ९४ हजार रुपये देण्याची योजना बनवली आहे.
रुग्णाला खाण्याचा खर्च, राहण्याचे भाडे, फोनचं बिल यासाठी सरकारकडून ही मदत दिली जाणार आहे. कॅलिफोर्नियाच्या अलामेडा काऊंटीच्या संचालकांचे म्हणणं आहे की, कोरोना संक्रमित झाल्यानंतर अनेकांना २ आठवडे क्वारंटाईन आणि आयसोलेट होणं परवडत नाही. त्यासाठीच सरकारने अशा लोकांना मदत करण्यासाठी १२५० यूएस डॉलर(९४ हजार रुपये) देण्याचा निर्णय घेतला आहे.
Los Angeles Times च्या रिपोर्टनुसार काऊंटी बोर्डाने सर्वसमंतीने ही पायलट योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत कोरोना संक्रमित रुग्णांना ९४ हजार रुपये देण्याचा निर्णय आहे. जर लोकांना आयसोलेट होण्याच्या कारणास्तव कोरोना चाचणी करण्यास नकार दिला तर देशात कोरोना संक्रमण वाढेल अशी भीती सरकारला आहे. त्यामुळे ही योजना आणून जास्तीत जास्त लोकांना कोरोना चाचणी करण्यास आकर्षित करता येईल असं त्यांना वाटतं. ९४ हजारांची मदत मिळवण्यासाठी व्यक्तीला संबंधित दवाखान्यात कोरोना चाचणी करावी लागणार आहे.
त्याचसोबत ज्या व्यक्तीला ही मदत मिळेल त्याच्यासाठी योजनेत काही अटी घालण्यात आल्या आहेत. यामध्ये कोणत्याही पेड सिक लीव मिळालेल्या व्यक्तीला योजनेचा लाभ घेता येणार नाही. किंवा सरकारकडून कोणत्याही प्रकारचा बेरोजगार भत्ता सुरु असेल तरी योजनेचा लाभ होणार नाही. या नवीन निर्णयामुळे अलामेडा काऊंटीला अपेक्षा आहे की, लोक संक्रमित झाल्यानंतर स्वत:ला आयसोलेट करण्यासाठी प्रोत्साहित होतील. त्यासोबतच जास्तीत जास्त लोक कोरोना चाचणी करण्यास तयार होतील असा विश्वास त्यांना वाटत आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी! सप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार? विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारनं बनवला प्लॅन
रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चौथऱ्यावरुन हटवला; मणगुत्तीमध्ये शिवप्रेमी संतापले
वाढदिवसानिमित्त वडील उद्धव ठाकरेंकडून पुत्र तेजसला अनोखं गिफ्ट; काय आहे पाहा...
बाईसाहेब, जरा सबुरीने घ्या; माजी पोलीस अधिकाऱ्याने लिहिलं अमृता फडणवीस यांना खुलं पत्र
“तुमच्या फायद्यासाठी माझ्या मुलीला बदनाम करु नका”; दिशा सालियानच्या आईवडिलांची आर्त विनवणी