शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
3
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
4
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
5
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
6
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
7
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : येवल्यातील गावात भुजबळांना मतदान केंद्रावर जाताना अडवले; शाब्दीक चकमक
8
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
10
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
11
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
12
जीवघेणं रॅगिंग! सीनियर्सनी अनेक तास उभं राहण्याची दिली शिक्षा; विद्यार्थ्याचा झाला मृत्यू
13
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
14
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
15
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
16
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
17
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
18
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
19
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
20
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?

या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 6:11 PM

Cameron Airpark Town: या गावातील प्रत्येक घरासमोर कार-बाईक नाही, तर विमान पार्क केलेले असते.

Cameron Airpark Town: घराबाहेर कार आणि बाईक पार्क करणे एक सामान्य गोष्ट आहे. एखाद्याच्या घराबाहेर किती महाग कार आहे, त्यावरुन त्याच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाजा येतो. पण, आज आम्ही तुम्हाला अशा एका गावाबद्दल सांगणार आहोत, ज्यात प्रत्येक घरासमोर कार किंवा बाइक नाही, तर चक्क विमान पार्क केलेले असतात. या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे खाजगी जेट आहे. विशेष म्हणजे, हे लोक चहापत्ती आणि दुधासारख्या दैनंदिन वस्तू आणण्यासाठी विमानाचा वापर करतात. 

प्रत्येक घरात खाजगी जेटअमेरिकेतील, कॅलिफेर्नियाच्या एल डोराडो काउंटी येथील कॅमेरॉन एअर पार्क नावाचे गाव विमान वाहतुकीसाठी अतिशय खास गाव आहे. या गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे खाजगी जेट आहे. गावात सुमारे 124 घरे आहेत. प्रत्येक घरासमोर स्वतःचे खाजगी जेट पार्क केलेले असते. तुम्ही विचार करत असाल की, गावातील लोक इतके श्रीमंत आहेत की, ते कार किंवा बाईकऐवजी जेट वापरतात, तर तसे नाही.

पायलटचे गावया गावाची स्थापना 1963 साली झाली. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेतील वैमानिकांची संख्या लक्षणीय वाढली होती. युद्धासाठी अनेक विमानतळ बांधले गेले. युद्ध संपल्यानंतर ते बंद झाले नाहीत. सरकारने ही एअरफील्ड्स निवासी एअर पार्क म्हणून सोडली. नंतर सरकारने या भागात निवृत्त वैमानिकांना राहण्याची व्यवस्था केली. कॅलिफोर्नियातील कॅमेरॉन एअर पार्क हे असेच एक एअरफिल्ड आहे, जिथे प्रत्येक कुटुंबाचे स्वतःचे खाजगी जेट आहे.

लोक स्वतः विमाने उडवतातया गावातील बहुतांश लोक निवृत्त वैमानिक आहेत, त्यामुळे ते स्वतःची विमाने देखील उडवतात. हे एअरफील्ड असल्याने रस्तेही अशाच पद्धतीने बांधण्यात आले आहेत. लोकांच्या घरात गॅरेजऐवजी हँगर्स आहेत. येथील रुंद रस्ते धावपट्टीसारखे काम करतात. कॅमेरून एअरपार्कच्या रस्त्यांवर लावण्यात आलेले साइन बोर्ड आणि लेटरबॉक्सही खाली उतरवण्यात आले आहेत, जेणेकरून विमान उड्डाण करताना कोणतीही अडचण येऊ नये. या गावाची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAmericaअमेरिकाInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सairplaneविमान