वैज्ञानिक क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होत चालली आहे. ज्यामुळे निसर्गाशी निगडीत अनेक रहस्य समोर येऊ लागले आहेत. ज्यावर विश्वास ठेवणेही कठीण आहे. काही वर्षांपूर्वी नोबेल पुरस्कार विजेते आणि महान वैज्ञानिक जगदीश चंद्र बोस यांनी झाडे आणि वनस्पतींमध्ये जीवन असल्याचं म्हटलं होते. संशोधकांसाठी हा नवा रिसर्च विषय होता. वैज्ञानिकदृष्ट्या हे प्रमाणित झाले तेव्हा अनेकांनी ते सहजपणे स्वीकारले.
आता इस्त्राईलच्या वैज्ञानिकांनी त्यांच्या शोधात नवीन शोध लावला आहे. यात आनंद आणि दु:खात झाडे वनस्पतींमधून निघणाऱ्या आवाजातून ते समजणे यशस्वी ठरले आहेत. इस्रायली टीमने लावलेला हा शोध १०५ वर्षांपूर्वी जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतींमध्ये संवेदनशीलतेबद्दल बोलले होते हे सत्य सिद्ध करते. सेल या प्रसिद्ध जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. शोधावेळी तंबाखू आणि टॉमेटो सारख्या झाडांजवळ एक विशेष अल्ट्रासोनिक यंत्र ठेवण्यात आले होते.
या शोधात असं आढळून आले की, जेव्हा पाण्याअभावी झाडे खराब होतात. त्या काळात, ते एका तासात २० ते १०० kHz च्या फ्रीक्वेंसीने आवाज करतात. हा आवाज मनुष्य ऐकू शकत नाहीत. पण प्राणी आणि आसपास असलेली दुसरी झाडे त्यांना ऐकायला येते. त्यावरूनच एखादा प्राणी कोणत्या झाडाखाली अंडी देणे योग्य आहे किंवा नाही हे ठरवू शकतो. या झाडांचा आवाज एका साऊंड प्रूफ चेंबरमध्ये रेकॉर्ड करण्यात आला.
आनंद आणि वेदना यासाठी झाडांमधून येणारा आवाजाचा शोध नवा रिसर्च आहे. सर्वात विशेष म्हणजे जर या झाडांच्या आवाजाचा पॅटर्न समजण्यात यश आले तर या स्थितीत झाडांसोबत थेट संवाद साधता येऊ शकते. या शोधाचा मोठा उपयोग येणाऱ्या काळात होणार आहे. कारण यामुळे शेतकऱ्यांना कोणत्या झाडांना कधी पाणी द्यायचे आणि कधी नाही हे शोधता येईल.